Ek Villain Returns : फ्लॉप होणार का चित्रपट ? बघा आतापर्यंत चित्रपटाने किती कमाई केली…

Updated on 04-Aug-2022
HIGHLIGHTS

Ek Villain Returns चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

एक व्हिलन रिटर्न्सचे एकूण बजेट 60 कोटी रुपये होते

चित्रपटाची आतापर्यंतची कमाई जवळपास 31 कोटी

मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन रिटर्न्स' शुक्रवारी रिलीज झाला. मेकर्ससह स्टारकास्टलाही आशा होती की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल. परंतु मोठे स्टार्स असूनही हा चित्रपट थिएटर गाजवू शकला नाही. या चित्रपटात अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. या चारही स्टारकास्टचे यापूर्वीचे चित्रपटही फ्लॉप ठरले आहेत. अशा परिस्थितीत 'एक व्हिलन रिटर्न्स' हिट होण्यासाठी दबाव होता. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकला नाही आणि या चित्रपटाचे कलेक्शन फक्त 40 ते 45 कोटीमध्ये आटपण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : Nokia 8120 4G फोन भारतात लाँच, जाणून घ्या परवडणाऱ्या फिचर फोनची किंमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक व्हिलन रिटर्न्सचे एकूण बजेट 60 कोटी रुपये होते. त्यानुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सुमारे 8 कोटींचा व्यवसाय करायला हवा होता. पण, वीकेंडला एक व्हिलन रिटर्न्सच्या व्यवसायात थोडा फायदा झाल्याचे. तेव्हा हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकेल अशी अपेक्षा होती. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा धुळीस मिळवताना दिसतोय.

29 जुलै रोजी एक व्हिलन रिटर्न्स मोठ्या पडद्यावर येऊन आता सहा दिवस झाले आहेत. पण चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये फारशी सुधारणा होताना दिसत नाही. चला तर मग आम्ही तुम्हाला या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल सांगतो- पहिल्या दिवशी 7.05 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.47 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.02 कोटी, चौथ्या दिवशी 3.02 कोटी, पाचव्या दिवशी 2.84 कोटी आणि सहाव्या दिवशी 2.40 कोटी अशाप्रकारे एकूण 31.80 कोटींची आतापर्यंत कमाई झाली आहे. 

मोहित सुरी दिग्दर्शित, एक व्हिलन रिटर्न्स हा सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर अभिनित 'एक व्हिलन'चा सीक्वल आहे. एक व्हिलन चित्रपट मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात एक नायक आणि एक खलनायक दाखवण्यात आला होता, तर एक व्हिलन रिटर्न्समध्ये चारही प्रमुख पात्रे खलनायकाच्या भूमिकेत आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :