Liva Q मिनी PC ची किंमत 15,500 रुपये आणि बिना OS च्या या डिवाइस ची किंमत 13,500 रुपये आहे.
ECS एलीटग्रुप क्म्प्यूटर सिस्टम ने आपला नवीन डिवाइस Liva Q मिनी-PC लॉन्च केला आहे. या पीसी ची खासियत आहे याची साइज. Liva Q चे डायमेशन 70mm x 70mm x 31.4mm, पण याचे वजन 260 ग्राम आहे. मिनी पीसी विंडोज 10 होम सह येतो आणि याची किंमत 15,500 रुपयां पासून सुरू आहे. पण तुम्ही बिना ऑपरेटिंग सिस्टम या डिवाइस ला 13,500 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. Liva Q मिनी पीसी 4 जीबी रॅम सह इंटेल च्या अपोलो लेक प्रोसेसर वर चालतो. यात 32 जीबी स्टोरेज आहे,जी माइक्रो एसडी कार्ड ने 128 जीबी पर्यंत वाढवता येते. कंपनी चा दावा आहे की Liva Q 4K प्लेबॅक ला पण हँडल करण्यास सक्षम आहे.
कनेक्टिविटी साठी RK45 LAN कनेक्टर, 802.11 एसी आणि ब्लूटूथ 4.1 वायरलेस कनेक्शन चा समावेश आहे. हा 2 यूएसबी पोर्ट आणि एक HDMI पोर्ट सह येतो.