गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने देशातील सर्व मोठे ई-रिटेलर्स आपल्या सामानावर सर्वोत्कृष्ट ऑफर्स देत आहे.
गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने ई-रिटेल कंपन्या उत्कृष्ट सूट देऊन सामानावर सर्वोत्कृष्ट ऑफर्स देत आहेत. काही कंपन्या तर ८० ते ९० टक्क्यांच्या सूटसह आकर्षक ऑफरसुद्धा देत आहे.
मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट जसे की, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन, ईबे आणि मिंत्रा सारख्या ई-रिटेल कंपन्या तर आकर्षक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कपडे, एक्सेसरीज, होम अप्लायन्सेस सारख्या उत्पादकांवर दैनंदिन जीवनातीन आवश्यक वस्तूंवर १५ ते ८० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे.
ह्या सूटसह आकर्षक ऑफर्स देणा-या ई-रिटेलर्सच्या अधिका-यांनीही ह्या संबंधी माहिती दिली आहे. अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष समीर कुमार ह्या ऑफर्सविषयी माहिती देताना म्हणाले की, “७२ तासांच्या ह्या ऑफर्समध्ये आमच्या ग्राहकांना विविध उत्पादनांवर सर्वोत्कृष्ट असा खरेदीचा अनुभव मिळेल.”
तर स्नॅपडिलच् उपाध्यक्ष राहुल तनेजा यांनी सांगितले की, ”आम्हाला ह्या दिवसांत ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळतो, पण गणतंत्र दिवसात ग्राहक जास्त खरेदी करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आमच्या ह्या सेलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. खासकरुन इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आम्हाला चांगली विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच ह्या सेलमधून अधिकाधिक युवकांना आकर्षित करणे हाच आमचा उद्देश आहे.”