बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाचा 2019 चा हिट चित्रपट 'ड्रीम गर्ल' च्या सिक्वेलची रिलीज डेट जाहीर
अनन्या पांडेची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 23 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार
'सत्य प्रेम की कथा' चित्रपटासोबत स्पर्धा टाळण्यासाठी बदलला निर्णय
बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाचा 2019 चा हिट चित्रपट 'ड्रीम गर्ल' च्या सिक्वेलची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे. अभिनेत्री अनन्या पांडेची भूमिका असलेला हा चित्रपट आता 23 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'सत्य प्रेम की कथा' चित्रपटासोबत स्पर्धा टाळण्यासाठी चित्रपट एक आठवड्याआधी रिलीज होणार आहे. कारण, 'ड्रीम गर्ल 2' 29 जून 2023 रोजी 'सत्य प्रेम की कथा' सोबत त्याच दिवशी रिलीज होणार होता.
साजिद नाडियाडवाला निर्मित 'सत्य प्रेम की कथा' त्याच दिवशी रिलीज होणार आहे, हे कळताच 'ड्रीम गर्ल 2' निर्मात्या एकता आर कपूरने 'ड्रीम गर्ल 2' ची तारीख 29 जून ऐवजी 23 जून 2023 वर बदलण्याचा निर्णय घेतला.
'ड्रीम गर्ल 2' च्या निर्मात्यांनी नुकताच एक टीझर रिलीज केला आणि चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली.दरम्यान, आयुष्मानचा नुकताच 'डॉक्टर जी' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यावेळी 'डॉक्टर जी' मधून या अभिनेत्याने पुन्हा एकदा स्त्रीरोगतज्ञाची ऑफ-बीट भूमिका साकारली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.