शिवछत्रपतींच्या ‘डुडल’साठी ऑनलाइन मोहीम जोरदार सुरु

शिवछत्रपतींच्या ‘डुडल’साठी ऑनलाइन मोहीम जोरदार सुरु
HIGHLIGHTS

यासाठी इंटरनेट युजर्सना proposals@google.com या गुगलच्या अधिकृत ई-मेलवर शिवाजी महाराजांच्या डुडलची मागणी करण्यासाठी आवाहन केले आहे.

येत्या १९ फेब्रुवारीला असलेल्या शिवजयंतीच्या दिनाच्या निमित्ताने गुगलच्या होमपेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचे डुडल प्रदर्शित व्हावे याकरिता जगभरातील शिवप्रेमींनी जोरदार ऑनलाइन मोहीम सुरु केली आहे. ह्या माध्यमातून शिवरायांचे संपुर्ण जीवन जगासमोर यावे, आणि गुगलने आपल्या डुडलद्वारे महाराजांचे कार्य जगभरात पोहोचावे, यासाठी सर्वच शिवप्रेमी आटोकाट प्रयत्न करत आहेत.

 

आतापर्यंत गुगलच्या डुडल माध्यमातून अनेक महान, थोर व्यक्तिंच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये अनेक समाजसेवक, शास्त्रज्ञ, संशोधक, वैझानिक अशा अनेक क्षेत्रातील महान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्यामुळे डुडलच्या माध्यमातून आता सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या शिवछत्रपतींचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा ह्या उद्देशाने आपले सध्याचे नव्या दम्याचे मावळे म्हणजेच आजची तरुण पिढी अगदी पेटून उठली आह. शिवजयंती अगदी काहीच दिवस शिल्लक असताना, ह्या शिवप्रेमींनी सोशल मिडियाचाच आधार घेऊन ही ऑनलाइन मोहीम उघडली आहे. यासाठी इंटरनेट युजर्सना proposals@google.com या गुगलच्या अधिकृत ई-मेलवर शिवाजी महाराजांच्या डुडलची मागणी करण्यासाठी आवाहन केले आहे.

तसेच http://change.org/shivajidoodle या लिंकवर जाऊन यूजर्स या संकेतस्थळाद्वारे डुडलसाठी समर्थन देऊ शकतात. सोशल मीडियावरही #DoodleofShivray या हॅशटॅगद्वारे या मागणीचा "ट्रेंड‘ जगभरात पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीला गुगलवरून प्रदर्शित होणारे डुडल हा टेक्‍नोसॅव्हींचा शिवरायांना खरा मानाचा मुजरा ठरेल असे मत शिवप्रेमी नेटिझन्सनी व्यक्त करत अधिकाधिक संख्येने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा – ३५,००० च्या किंमतीत येणारे आणि उत्कृष्ट कॅमेरा सेंसर असलेले सर्वोत्कृष्ट कॅमेरे

हेदेखील वाचा – लेनोवो A7000 आणि लेनोवो K3 नोट यांची तुलना

 
Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo