आयुष्मान खुराना अभिनित ‘Doctor G’ चित्रपट 14 ऑक्टोबरला रिलीजसाठी सज्ज, ट्रेलर रिलीज

आयुष्मान खुराना अभिनित ‘Doctor G’ चित्रपट 14 ऑक्टोबरला रिलीजसाठी सज्ज, ट्रेलर रिलीज
HIGHLIGHTS

डॉक्टर जी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

हा चित्रपट 14 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

ट्रेलरमध्ये पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यास महिला कशा कचरतात हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अभिनेता आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'डॉक्टर जी' हा एक मेडिकल कॅम्पस कॉमेडी-ड्रामा 14 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. 'डॉक्टर जी'मध्ये आयुष्मान एका वैद्यकीय विद्यार्थ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. आयुष्मान खुरानाचा बहुप्रतिक्षित 'डॉक्टर जी' चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला.

हे सुद्धा वाचा : Vivo V25 5G: 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि कलर चेंजर असलेल्या 'या' फोनची पहिली विक्री आज

 डॉक्टर जी च्या कलाकारांमध्ये डॉ. फातिमा सिद्दीकीच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंग आणि डॉ. नंदिनी श्रीवास्तवच्या भूमिकेत शेफाली शाह आणि आयुष्मानच्या आईच्या प्रमुख भूमिकेत शीबा चढ्ढा या अभिनेत्री दिसणार आहेत.

आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर 'डॉक्टर जी' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, "जिंदगी है मेरी फुल ऑफ गुगली, चाहिये था ऑर्थोपेडिक्स, पर बने डॉक्टरजी, तयार व्हा, डॉक्टरजी 14 ऑक्टोबर 2022 पासून चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे."

आयुष्मान खुराना नेहमीच आउट ऑफ द बॉक्स चित्रपटांसाठी ओळखला जातो. यावेळीही त्यांनी वेगळ्या विषयावरचा चित्रपट निवडला आहे. या चित्रपटात तो महिला डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा ट्रेलर खूप चांगला आहे. ट्रेलरमध्ये पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यास महिला कशा कचरतात हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटातील अभिनेत्याच्या पात्राचे नाव आहे उदय गुप्ता.

सामाजिक मुद्द्यावर बनलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना आवडला आहे. आता सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक लोक या ट्रेलरवर हार्ट इमोजी पोस्ट करून आयुष्मानवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo