श्याओमीच्या दिवाळी धमाका सेलमध्ये मिळणार केवळ १ रुपयात शानदार गॅजेट्स

श्याओमीच्या दिवाळी धमाका सेलमध्ये मिळणार केवळ १ रुपयात शानदार गॅजेट्स
HIGHLIGHTS

उद्यापासून सुरु होणा-या सेलमध्ये श्याओमीने आपल्याला १ रुपयात चांगले आणि उत्कृष्ट डिवाइस देणार आहे, मात्र ह्यात मोबाईल नसणार. त्या व्यतिरिक्त आपल्याला उत्कृष्ट गॅझेट नक्की मिळतील.

जसे की आपल्याला  सर्वांना माहितच आहे की, फेस्टिव सीझन सुरु झाला आहे आणि सर्व ई-कॉमर्स साइट्सवर मोठमोठी डिस्काउंट सेल आता सर्वसामान्य झाली आहेत. मात्र ह्या ऑफरच्या दुनियेमध्ये श्याओमीसुद्धा पाऊल टाकले आहे. श्याओमी ह्या डिस्काउंंट सेलच्या दुनियेत धमाकेदार प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता श्याओमीने आपल्या वापरकर्त्यांसाठी दिवाळीत काही शानदार ऑफर्स घेऊन येण्याच्या विचारात आहे. सूत्रांनुसार असे सांगतले जातेय की, श्याओमी हया शानदार ऑफरसह आपल्या ग्राहकांसाठी १ रुपयाच्या किंमतीत उत्कृष्ट प्रोडक्ट्स देण्याच्या विचारात आहे. ह्या प्रो़डक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, आपल्याला १ रुपयात mi बँड, mi पॉवर बँक सारखे अनेक उत्कृष्ट प्रोडक्ट्स मिळणार आहे. जरी ह्या सेलमध्ये मोबाईल आपल्याला १ रुपयात मिळणार नाही, मात्र आपल्याला त्यासारखे अनेक उत्कृष्ट गॅझेट्स नक्की मिळतील.

 

ही माहिती श्याओमी इंडियाचे मुख्य अधिकारी मनू  जैनद्वारा देण्यात आली आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, “ह्या सेलमध्ये आपण १ रुपयात” अनेक उत्कृष्ट डिवाईस घेऊ शकता.”

श्याओमीने ट्विटरच्या माध्यमातून असे संकेत दिले आहेत की, ते ह्या वर्षी ग्राहकांसाठी उत्कृष्ट ऑफर्स आणणार आहेत. श्याओमीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘दिवाली विथ मी’ सोबत ३,४ फटाकेसुद्धा दाखवले आहेत. जे दिवाळी आणि चांगल्या डिस्काउंटकडे इशारा करतायत. हा सेल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ह्यात खूप चांगले आणि आकर्षक डिस्काउंट मिळतील.

जर श्याओमीने अशा प्रकारच्या सेलचे आयोजन केले, ज्यात आपल्याला मोठे डिस्काउंट मिळतील तर हा सेल mi.com च्या माध्यमातून केला जाईल. जेथे तुम्ही सर्व ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

आपण फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलच्या माध्यमातून श्याओमीचे अनेक प्रोडक्ट्स चांगल्या डिस्काउंटसह आधीच घेऊ शकतात. जेथे लाँचवेळी श्याओमी Mi4i ची किंमत १२,९९९ रुपये होती, तोच आज ९,९९९ रुपयांत सहजरित्या उपलब्ध होईल.

नाहीतर असेही होऊ शकते की, श्याओमी आपला कोणतातरी नवीन प्रोडक्ट बाजारात उतरवेल. श्याओमीबद्दल जशी जशी आम्हाला माहिती मिळत जाईल, तशीतशी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. टेक जगतातील अशा सर्व बातम्यांशी जोडलेले राहण्यासाठी आपण आमच्या फेसबुक पेजवर लाईक किंवा फॉलो करु शकता.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo