ICC World Cup 2023 आज म्हणेजच 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा भारतात आयोजित केली जात आहे. स्टार स्पोर्ट्स टीव्ही चॅनलसह Disney+Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर देखील वर्ल्ड कपचे सर्व सामने पाहता येतील. विशेष म्हणजे प्लॅटफॉर्मवर नवे ‘Max View’ फीचर जोडण्यात आले आहे, ज्यामुळे क्रिकेटचे समे बघण्यात आता खरी मजा येणार आहे. काय आहे या फिचरमध्ये खास? वाचा सविस्तर
हे सुद्धा वाचा: Oppo A18 कंपनीचा नवीन Affordable स्मार्टफोन भारतात लाँच, फोनच्या खरेदीसह विशेष विजेत्यांना Enco Buds 2 मोफत | Tech News
खरं तर, हे फिचर मॅच बघणे तुमच्यासाठी अधिक आरामदायी बनवू शकते. कारण या फीचरसह तुम्ही फोन व्हर्टिकल ठेऊन देखील मॅक बघू शकता. यासाठी तुम्हाला दोन्ही हातांचा वापर करावा लागणार नाही. Disney+ Hotstar च्या मते, OTT प्लॅटफॉर्मने Max View मध्ये लाइव्ह फीड टॅब, स्कोअरकार्ड आणि वर्टिकल जाहिराती समाविष्ट केल्या आहेत. या फीचरमध्ये सिंगल हँड फ्रेम उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही मॅचची प्रत्येक क्रिया अगदी जवळून पाहू शकता.
एवढेच नाही तर, तुम्हाला Max View मध्ये स्प्लिट व्ह्यू चे देखील समर्थन मिळणार आहे. यासह तुम्ही मॅच सुरु ठेऊन ऍपच्या बाहेरून येऊन इतर कामांसाठी तुमच्या फोनचा वापर करू शकता. हे फिचर लवकरच अँड्रॉइड आणि IOS अशा दोन्ही उपकरणांसाठी रिलीज केले जाणार आहे. Disney+ Hotstar या वेळी वर्ल्ड कप 2023 साठी अधिक चांगले अपडेट केले गेले आहे. यामध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे व्हिडिओची कॉलिटी सुधारली आहे.
मॅक्स व्ह्यू व्यतिरिक्त, Disney+ Hotstar ने Coming Soon Tray फीचर देखील सादर केले आहे. या फीचरमध्ये यूजर्सना लवकरच प्रदर्शित होणार्या किंवा आगामी चित्रपट आणि शोची माहिती सहज मिळेल. विशेष म्हणजे, ही सुविधा प्राइम आणि नॉन-प्राइम दोन्ही सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.