Disney+ Hotstar चे नवीन फिचर, एकही रुपया खर्च न करता बघा T20 वर्ल्ड कपची स्थिती

Updated on 01-Nov-2022
HIGHLIGHTS

Disney+ Hotstar चे नवीन फॉलो ऑन फिचर

या फीचरसह ICC मेन्स T20 सामन्यांची स्थिती बघता येईल.

विद्यमान वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्म नवीनतम वर्जनवर अपडेट करावे लागेल.

Disney+ Hotstar चे महत्त्व आजकाल क्रिकेटप्रेमींसाठी वाढले आहे. कारण या ऍपवर ICC मेन्स T20 विश्वचषकाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. मात्र यासाठी तुम्हाला या प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल. आता डिजनी + हॉटस्टार वर एक नवीन फीचर उपलब्ध होणार आहे, ज्याद्वारे पैसे न देणाऱ्या फ्रीमियम वापरकर्त्यांना वर्ल्ड कपची स्थिती मिळत राहील. नवीन फीचरला 'फॉलो ऑन' असे नाव देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : देशातील सर्वात स्वस्त 5G फोन 3 नोव्हेंबर होणार दाखल, 50MP कॅमेरासह मिळतील अनेक मस्त फीचर्स

फॉलो-ऑन फिचर म्हणून ऍपमध्ये एक विशेष व्हिडिओ फीड समाविष्ट करण्यात आला आहे. जो वापरकर्त्यांना रिअल टाइममध्ये क्रिकेट सामन्याबद्दल माहिती देईल. लाइव्ह स्कोअरपासून गेम हायलाइट्स आणि गेमवरील तज्ञांच्या मतांपर्यंत, हे फीड पाहिले जाऊ शकते. म्हणजेच, सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहिले गेले नसले तरीही, सर्व हॉटस्टारच्या वापरकर्त्यांना रिअल-टाइममध्ये सामन्याची स्थिती मिळत राहील.

Disney+ Hotstar चे प्रवक्ते फॉलो ऑन फीचर लाँच करताना म्हणाले, ''आमचा प्लॅटफॉर्म हा नेहमीच भारतातील सर्वोत्तम-इन-क्लास लाइव्ह स्पोर्ट्स अनुभव देतो. फॉलो ऑन सह, आम्ही प्रिमियम क्रिकेट मनोरंजनाचे फायदे प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहोत. यासह सर्व मॅच अपडेट्स दर्शकांना बघायला मिळतील.'' 

'अशा' प्रकारे तुम्हाला नवीन Disney + Hotstar फीचरचा लाभ मिळेल

नवीन फॉलो ऑन फिचरसह T20 विश्वचषक सामन्याची स्थिती जाणून घेण्यासाठी, वापरकर्त्यांना Google Play Store किंवा Apple App Store ला भेट देऊन हे स्ट्रीमिंग ऍप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, तुमचा मोबाइल नंबर आणि त्यावर पाठवलेला OTP यांच्या मदतीने लॉगिनचा पर्याय दिला जाईल. लॉग इन केल्यानंतर, हे फिचर  स्वयंचलितपणे सुरू होईल. वापरकर्ते सामना सुरू होण्यापूर्वी नवीन फीड फॉलो करू शकतील. विद्यमान वापरकर्त्यांना ऍप नवीनतम वर्जनवर अपडेट करावे लागेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :