सध्या OTTचे वाढते क्रेझ बघता बरेच चित्रपट आता थेट OTTवर रिलीज केले जात आहेत. तसेच, चित्रपटगृहात रिलीज झालेले चित्रपटदेखील रिलीजच्या काही काळानंतर OTTवर रिलीज केले जातात. त्याबरोबरच, TVवरील तुमचे आवडते शो किंवा क्रिकेटविश्वातील सामने तुम्हाला थेट OTT प्लॅटफॉर्मवर बघण्याची सुविधा सुरु झाली आहे. पण यासाठी तुमच्या कडे OTT प्लॅटफॉर्म्सचे सब्स्क्रिप्शन असणे आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला Disney+ Hotstar बद्दल सांगणार आहोत. तुम्हाला Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मोफत हवे असल्यास, हा पर्याय टेलिकॉम कंपन्यांच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा : सिनेरसिकांसाठी खुशखबर ! Drishyam 2 च्या तिकिटांवर थेट 25% सूट, जाणून घ्या कसा घ्याल ऑफरचा लाभ…
Airtel वापरकर्त्यांना अशा सात प्लॅनमधून रिचार्ज करण्याचा पर्याय मिळतो, ज्यामध्ये डिजनी + हॉटस्टार सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. 399 रुपये, 499 रुपये आणि 599 रुपये किंमतीच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे आणि अनुक्रमे 2.5GB, 2GB आणि 3GB दैनिक डेटा ऑफर करतात. 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा मिळतो. जर तुम्हाला 84 दिवसांची वैधता हवी असेल, तर 839 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करता येईल आणि 2GB दैनिक डेटा मिळेल.
तर 2,999 रुपये आणि 3,359 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता आहे. यामध्ये, अनुक्रमे 2GB आणि 2.5GB दैनिक डेटा उपलब्ध आहे. Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन रु. 399, रु. 181 आणि रु 839 च्या प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी आणि उर्वरित प्लॅनमध्ये एक वर्षासाठी उपलब्ध आहे.
रिलायन्स JIO ने अलीकडेच Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन देणारे अनेक प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. आता Jio वापरकर्त्यांना या सबस्क्रिप्शनसाठी दोन रिचार्ज प्लॅनचा पर्याय मिळेल. 1,499 किंमतीचा पहिला प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज 2GB डेटा ऑफर करतो. तर, 4,199 रुपयांच्या दुसऱ्या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे आणि त्यात 3GB दैनिक डेटा उपलब्ध आहे. दोन्ही प्लॅनमध्ये एक वर्षाचे Disney+ Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS सारखे फायदे देखील आहेत.
तुम्ही Vi वापरकर्ता असल्यास 28 दिवसांची वैधता असलेला 399 रुपयांचा प्लॅन आणि 30 दिवसांच्या वैधतेचा 151 रुपयांचा प्लॅन दोन्ही तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन ऑफर करतात. या प्लॅनमध्ये अनुक्रमे 2.5GB दैनिक डेटा आणि 8GB एकूण डेटा मिळतो. या व्यतिरिक्त, रु. 499 आणि रु 601 प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतात आणि अनुक्रमे 2GB आणि 3GB दैनिक डेटा देतात.
901 रुपयांचा प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज 3GB डेटा ऑफर करतो. रु. 1,066 आणि रु 3,099 प्लॅन अनुक्रमे 84 दिवस आणि 365 दिवसांच्या वैधतेसह येतात आणि दोन्ही 2GB दैनिक डेटा ऑफर करतात. रु. 399 आणि रु. 151 च्या प्लॅन्स व्यतिरिक्त, Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन बाकीच्या एका वर्षासाठी उपलब्ध आहे.