ATM किंवा ई-बँकिंग फ्रॉड मुळे फसला आहात का, इथे करा तक्रार

ATM किंवा ई-बँकिंग फ्रॉड मुळे फसला आहात का, इथे करा तक्रार
HIGHLIGHTS

रोजच एटीएम, मोबाईल बँकिंग किंवा ऑनलाइनच्या माध्यमातून लोकांना नवीन आणि आकर्षक प्रस्ताव दिले जातात तसेच फ्रॉडच्या केस पण मिळतात. असे असताना जर तुमच्या सोबत कोणत्याही प्रकारचा फ्रॉड झाला तर तुम्ही लगेचच "डिजिटल लोकपाल" मध्ये याची तक्रार करू शकता.

महत्वाचे मुद्दे:

बँकिंग लोकपालच्या धर्तीवर बनला डिजिटल लोकपाल

कानपूर मध्ये फ्रॉडची जास्त प्रकरणे

तक्रारीसाठी जाहीर करण्यात आला फॉर्म

ऑनलाइनमुळे जेवढी सुविधा होते तेवढेच फसवे व्यवहार पण होतात. बँकिंग, ई-बँकिंग आणि नावनव्या ऍप्सच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करणारे प्रस्ताव देऊन त्यांना फ्रॉड केस मध्ये अडकवले जाते. डिजिटल देवाणघेवाणी मध्ये पण अशाप्रकारचे प्रकार समोर येत असतात. अशावेळी तुम्ही याची तक्रार थेट लोकपालकडे करू शकता. हो तुम्ही योग्य तेच वाचलत, डिजिटल बँकिंग मध्ये वाढत असलेले फ्रॉड आणि तक्रारी बघून पहिल्यांदाच "Digital Lokpal" ची निर्मिती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या "Digital Lokpal" ची निर्मिती बँकिंग लोकपालच्या धर्तीवर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश मधील कानपुर मध्ये दार महिन्याला 40 पेक्षा जास्त साइबर फ्रॉडच्या केसेस पोलीस आणि बँकेपर्यंत पोचतात. हे डिजिटल लोकपाल बँकिंग फ्रॉड संबंधित प्रकरणे हाताळतील आणि तुमच्या समस्येचे समाधान काढतील. विशेष म्हणजे डिजिटल लोकपाल कानपुर मध्ये RBI ऑफिस मध्ये बसतील.

पेमेन्ट आणि सट्टेलमेंट पॉलिसी अंतर्गत झाली निर्मिती

पेमेन्ट आणि सट्टेलमेंट पॉलिसी अंतर्गत सुरु झालेली हि डिजिटल देवाणघेवाणित लवकरात लवकर तक्रार आणि समाधान व्यवस्था पीडितांना देईल. तसेच जर बँकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या डिजिटल देवानीघेवाणी संबंधित एखादी तक्रार आली तर ती बँकिंग लोकपाल योजने अंतर्गत बघितली जाईल. डिजिटल देवानीघेवाणीसाठी लोकपाल कार्यालय बँकिंग लोकपाल मधील 21 कार्यालयांत काम करतील आणि आपल्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील ग्राहकांच्या तक्रारी बघतील.

अशाप्रकारे करू शकता तक्रार

डिजिटल देवाणघेवाणीची तक्रार नोंदवण्यासाठी आरबीआई ने एक फॉर्म जारी केला आहे. पीडित व्यक्तीला फॉर्म मध्ये जवळच्या लोकपाल ऑफिसचे नाव टाकायचे आहे. ज्या बँकेच्या विरोधात तक्रार आहे तिचे नाव, कोणत्या सिस्टमच्या माध्यमातून गडबड झाली आहे तिचे नाव, तक्रारदाराचा पत्ता आणि नाव, फोन नंबर, ई-मेल, तक्रारीचा तपशील पीडित व्यक्तीला द्यावी लागेल. फॉर्म सोबत सर्व डॉक्युमेंट्सची कॉपी पण द्यावी लागेल.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo