कंगना रणौतच्या 'धाकड' या चित्रपटाचा आता वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्याला OTT वर कसा प्रतिसाद मिळतो हे सध्या सांगता येणार नाही. अनेक वेळा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगले प्रदर्शन करू शकत नाही, परंतु त्यांना OTT वर चांगला प्रतिसाद मिळतो. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि शाश्वत चॅटर्जी हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे.
'धाकड' चित्रपट 1 जुलै रोजी ZEE5 वर प्रसारित होणार आहे. चित्रपटाची कथा इंटरनॅशनल टास्क फोर्सची स्पेशल एजंट असलेल्या अग्नि (कंगना) भोवती फिरते. इंटरनॅशनल ह्यूमन आणि शस्त्रास्त्र तस्कर रुद्रवीर (अर्जुन रामपाल) याला संपवण्यासाठी तिला एक मिशन सोपवण्यात आले आहे. या लढ्यादरम्यान अग्निच्या बालपणातील अनेक दु:खद गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येतात.
हे सुद्धा वाचा : Airtel चा सर्वात स्वस्त 1 वर्षाचा प्लॅन, एका दिवसाचा खर्च 5 रुपयांपेक्षा कमी, वाचा संपूर्ण तपशील
OTTवर चित्रपट प्रसारित करण्याबाबत कंगना म्हणाली, 'धाकड हा एक इंटेन्स चित्रपट होता, ज्यामध्ये खूप शारीरिक आणि भावनिक परिवर्तन आवश्यक होते. भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचे असू शकतात आणि त्यात मुख्य भूमिकेत महिला ऍक्शन हिरो असू शकतात. येत्या 1 जुलैपासून फक्त ZEE5 वर मला एक किलिंग मशीन म्हणून पाहण्यासाठी सज्ज व्हा."
चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले की, “धाकड हा आपल्या सर्वांच्या खूप जवळचा चित्रपट आहे. सहसा ऍक्शन फिल्म्स हे आपल्या इंडस्ट्रीमध्ये पुरुष कलाकारांशी निगडीत असतात. पण इथे आम्ही एक फिल्म तयार केली आहे, जी भारतीय चित्रपटांमधील अभिनेत्रींसाठी ऍक्शन जॉनरला पुन्हा परिभाषित करते आणि आम्हाला त्याचा खरोखर अभिमान आहे.