जगातील सर्वात किफायतीशीर फीचर फोन कंपनी डिटेल या सणासुदीच्या काळात आपल्या लॉन्चिंगचा उत्सव साजरा करत आहे. कंपनी ने आज ‘ट्रू कपॅसिटी’ असलेले दोन पावर बँक आणि दोन कार चार्जर सादर केले आहेत जेणेकरून तुम्हाला चालत फिरता पण तुमचे काम करता येईल. या दोन्ही पावर बँकची नावे आहेत- डीटेल स्टाइल आणि स्वैग, हे दोन्ही 10,000एमएएच क्षमता असलेले आहेत आणि दोघांची किंमत मात्र 799 रुपये आहे. तर दुसरीकडे डीसी24 आणि डीसी34 कार चार्जरची किंमत क्रमशः 299 रुपये आणि 399 रुपये आहे. हे चारही नवीन डिवाइसेज डिटेलच्या वेबसाइट, B2BAdda.com आणि मोठ्या ऑफलाइन रिटेलर्स कडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सतत प्रवासात राहणे सध्याच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. त्यामुळे पावर बँक आणि कार चार्जर ठेवणे लांबच्या प्रवासासाठी खूपच गरजेचे आहे कारण मनोरंजनासाठी मोबाईल गरजेचा बनला आहे. डिटेलचे कार चार्जर प्रत्येक प्रकारच्या वापरासाठी खासकरून डिजाइन करण्यात आले आहेत आणि हे जास्तीत जास्त कार्स साठी अनुकूल बनवण्यात आले आहेत. हे चार्जर स्मार्ट सेफ्टी सिस्टमने फिट होतात ज्यामुळे तुमचे गजेट्स ओवर करंट, ओवरचार्जिंग तसेच ओवरहिटिंग पासून वाचतात. प्रत्येक डिवाइस मध्ये 3 यूएसबी पोर्ट्स आहेत ज्याने तुम्ही एकाच वेळी काही डिवाइसेज चार्ज करू शकता. डीसी24 आणि डीसी34 चा यूएसबी आउटपुट करंट क्रमशः 2.4ए आणि 3.4ए आहे.
डिटेल स्वैग लेदर लुक आणि डिजिटल डिस्प्ले मध्ये उपलब्ध आहे. स्वैग आणि स्टाइल मध्ये आकर्षक आणि कॉम्पॅक्ट एक्सटेरियर आहे. दोन्ही डिवाइसेज सर्व आईओएस, एंड्रायड आणि अन्य यूएसबी-पावर्ड डिवाइसेज अनुकूल बनले आहेत. या पावर बँक तीन यूएसबी 2.0 पोर्टस, क्विक चार्ज सपोर्ट, 9-लेयर सर्किट चिप प्रोटेक्शन आणि एक वर्षाच्या मॅन्युफॅक्चरिंग वारंटी सह येतात. दोन्ही डिवाइसेज मध्ये एलईडी इंडिकेटर आणि टॉर्च पण आहेत.
लॉन्चिंग च्या वेळी डिटेलचे एमडी योगेश भाटिया ने सांगितले, “आम्ही नवीन क्षेत्रांत आणि उत्पादन वर्गांत ज्याप्रकारे मार्गक्रमण करत आहोत, त्यानुसार कंपनी साठी हि एक निर्णायक वेळ आहे. आमच्या ग्राहकांना दिलेल्या शब्दानुसार आम्ही उत्पदनांची अशी रेंज अनंत आहोत, जी किफायतीशीर किंमतीती सर्वश्रेष्ठ फीचर्स देतात. दोन्ही नवीन पावर बँक विशेष करून आजच्या पिढीनुसार डिजाइन करण्यात आले आहेत ज्यांना हाई परफॉरमेंस सोबतच उत्कृष्टता आणि विशेषता आवडते.”
पावर बँकची मागणी सतत वाढत आहे कारण स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्ट वॉच इत्यादी सह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिवाइसेज च्या युजर्सची संख्या वेगाने वाढत आहे आणि या डिवाइसेजचा वापर करण्याची अवधि पण वाढत आहे त्यामुळे त्यांचा पावर वापर पण वाढत आहे. पॉकेट कम्प्यूटर म्हणून ओळखले जाणारे हे डिवाइसेज सध्या आपल्या आयुष्याचामहत्वाचा भाग बनले आहेत कि यांना सतत चार्ज ठेवणे आणि यांच्यावर कम्म करणे तुमच्यासाठी महत्वाचे बनले आहे.
डिवाइसच्या सेफ्टी सिस्टम च्या दृष्टीने अत्यंत सक्षम हे पावर बँक अनेक प्रकारचे सुरक्षा मानक लक्षात ठेऊन बनवण्यात आले आहेत. याची नवीन रेंज क्वालिटी टेस्ट आणि बारकाईने बनवण्यात आले आहेत.