30 हजारांच्या आत खरेदी करा जबरदस्त AC, बघा सर्वोत्तम डील्स
30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्प्लिट AC
या डिल्स फ्लिपकार्ट आणि Amazonवर सहज मिळतील.
हे 1.5 टनचे AC मॉडेल्स आहेत.
ग्राहकांना आता उन्हाळ्याला घाबरण्याची गरज नाही, कारण AC आता स्वस्तात खास तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहेत. होय, हे 1.5 टनचे AC मॉडेल्स आहेत. त्यातल्या त्यात, हे AC तुम्हाला 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये मिळून जातील. साधरणतः या बजेटमधेय विंडोज AC मॉडेल्स मिळतात, मात्र आम्ही तुम्हाला स्प्लिट AC मॉडेल्सच्या डील्सबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला या डिल्स फ्लिपकार्ट आणि Amazonवर सहज मिळतील.
Thomson चा 1.5 Ton Split AC
फ्लिपकार्टवर या थॉमसन एसी मॉडेलवर 25% सूट दिली जात आहे, डिस्काउंटनंतर तुम्ही हे मॉडेल 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा AC ब्लू फिन कंडेन्सर, अँटी डस्ट फिल्टरसह येतो. यावर तुम्हाला 10 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देखील मिळते. हे स्प्लिट एसी मॉडेल 2 स्टार रेटिंगसह येईल.
AmazonBasics 1.5 टन 3 स्टार AC
हा एसी Amazon वर 45 टक्के मोठ्या डिस्काउंटसह मिळतोय. डिस्काउंटनंतर हे मॉडेल 28,990 रुपयांना सूचिबद्ध आहे. या स्प्लिट एसीमध्ये टर्बो मोड, अँटी डस्ट आणि बॅक्टेरियल फिल्टर, अँटी कॉरोजन कोटिंग आणि R32 गॅस उपलब्ध आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी साईटला भेट द्या.
MarQ कंपनीचे 1.5 टन स्प्लिट इन्व्हर्टर AC
तुम्हाला या एसीमध्ये ऑटो रीस्टार्ट आणि स्लीप मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 45% डिस्काउंटनंतर हा AC फ्लिपकार्टवर 28,999 रुपयांना विकला जात आहे. हा 1.5 टन एसी 3 स्टार रेटिंगसह येतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile