डाटाविंड MoreGmax 4G 7 टॅबलेट लाँच, किंमत ५,९९९ रुपये

Updated on 27-Jun-2016
HIGHLIGHTS

ह्या टॅबलेटसह एक वर्षासाठी मोफत इंटरनेटसुद्धा दिले जाईल.

डाटाविंडने बाजारात MoreGmax 4G 7 टॅबलेट लाँच केला आहे. हा टॅबलेट 4G सपोर्टसह येतो. कंपनीने ह्याची किंमत ५,९९९ रुपये ठेवली आहे. हा डिवाइस कंपनीची वेबसाइट डाटाविंड.कॉम आणि रिटेल स्टोर्सवरुन खरेदी करु शकता.

ह्या टॅबलेटमध्ये ७ इंचाची मल्टी-टच डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. ह्यात मल्टी-टच डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. ह्यात क्वाड-कोर कॉर्टेक्स A7 प्रोसेसरसुद्धा आहे. हा टॅबलेट 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या डिवाइसमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – काय मिळतय विराट फॅनबॉक्सच्या आत? पाहा आमच्या नजरेतून…

ह्यात 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 3 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्यात वायफाय, हॉटस्पॉट, वायफाय डायरेक्ट, ब्लूटुथ आणि GPS सारखे फिचर्स दिले आहेत. कंपनी ह्या टॅबलेटसह १ वर्षासाठी मोफत इंटरनेटसुद्धा देत आहे.

 

हेेदेखील वाचा – २९ जूनला होणार लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल
हेेदेखील वाचा – स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :