CrowdStrike Down: सायबरसुरक्षा प्लॅटफॉर्म CrowdStrike जगभरात डाउन! अनेक युजर्स सिस्टममधून लॉग आउट, वाचा डिटेल्स
CrowdStrike अपडेटमुळे अनेक Windows वापरकर्त्यांना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) एररची समस्या
Blue Screen of Death (BSoD) म्हणजे काय?
हा आउटेज जगभर होत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आदी जगभरातील लोक त्यांच्या समस्या मांडत आहेत.
CrowdStrike Down: अलीकडील CrowdStrike अपडेटमुळे अनेक Windows वापरकर्त्यांना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) एररचा सामना करावा लागत आहे. कंपनीच्या फोरमवर एक रिपोर्ट आणि पिन केलेल्या मेसेजच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही समस्या सर्वत्र पसरलेली आहे, ज्यामुळे विविध CrowdStrike सेन्सर वर्जनवर चालणाऱ्या मशीनवर परिणाम होतो. CrowdStrike ने ही समस्या मान्य केली आहे आणि सध्या कारणाचा तपास सुरु आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Reddit युजरने TipOFMYTONGUEDAMN ने कळवले आहे की, CrowdStrike सर्व्हर डाउन आहेत आणि BSOD एरर अनुभवत आहेत. ही एरर नक्की काय आहे? खरं तर, BSOD एरर म्हणजे ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर हे स्टॉप एरर म्हणूनही ओळखले जाते. ही एक अतिशय गंभीर एरर मानली जाऊ शकते.
Blue Screen of Death (BSoD) म्हणजे काय?
स्टॉप एरर किंवा बग चेक स्क्रीन म्हणूनही ओळखली जाणारी ही कुप्रसिद्ध ब्लु स्क्रीन सिस्टम एरर दर्शवते. जी ऑपरेटिंग सिस्टमला थांबवण्यास भाग पाडते, परिणामी संपूर्ण सिस्टम क्रॅश होते. ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSoD) हे बऱ्याच काळापासून जगभरातील विंडोज वापरकर्त्यांसाठी निराशा आणि दहशतीचे आश्रयस्थान आहे.
BSoD ने Windows 1.0 मध्ये सुरुवात केली होती, हे त्याच्या पूर्वीच्या वर्जनपेक्षा खूपच सोपे आहे. काळानुसार, जसजसे विंडोज विकसित होत गेले, तसे BSoD देखील विकसित झाले. हे डिझाइनमध्ये अधिक परिष्कृत झाले आणि थोडे अधिक माहितीपूर्ण एरर मेसेज प्रदान करत गेले. मात्र, त्याचा मुख्य उद्देश वापरकर्त्यांना गंभीर सिस्टम एरर्सबद्दल सावध करणे, ज्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे, हा होय.
आम्ही सांगितल्याप्रमाणे, संपूर्ण जगात आउटेज होत आहेत. या पोस्टमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि इतर देशांतील वापरकर्ते सामील झाले आहेत.
एरर कसे आले?
वर सांगितल्याप्रमाणे, हा आउटेज जगभर होत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आदी जगभरातील लोक त्यांच्या समस्या मांडत आहेत. आउटेजमागील कारण त्यांच्या मुख्य उत्पादन Falcon मधील तांत्रिक त्रुटी असल्याचे मानले जात आहे. विंडोज प्रणाली सुरक्षित करण्यासाठी ही एक प्रमुख सुरक्षा प्रणाली आहे. त्यामुळे जगभरातील युजर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
CrowdStrike Falcon सायबर सुरक्षा उपाय प्रदान करते. जसे की, डिटेक्शन एंड रिस्पॉन्स, थ्रेट इंटेलिजेंस, इन्सिडेंट रिस्पॉन्स, विंडो सिक्योरिटी फीचर्स, सिक्योरिटी अपडेट्स आणि पॅचेस होय.
CrowdStrike ही एरर मान्य केली आहे आणि म्हणाले की, “आमचे अभियंते या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. ते असेही म्हणाले की, यासाठी सपोर्ट तिकीट उघडण्याची आवश्यकता नाही.” शिवाय, हा प्रश्न सुटल्यावर कळवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile