इंडियन स्टार्ट-अप क्यूब26 (Cube 26) ने ‘IOTA Lite’ नावाचा बल्ब लाँच केला आहे, जो आपल्या मोबाईलने ऑपरेट होऊ शकतो. आजपासून हा फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी केला जाऊ शकतो.
इंडियन स्टार्ट-अप क्यूब26 (Cube 26) ने ‘IOTA Lite’ नावाचा बल्ब लाँच केला आहे, जो आपल्या मोबाईलने ऑपरेट होऊ शकतो. ह्याची किंमत १४९९ रुपये असल्याचे सांगण्यात येतय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, २० रुपयात येणार बल्ब १५०० रुपयात का खरेदी करायचा. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा काही सामान्य बल्ब नाही. कंपनीचा दावा आहे की, हा बल्ब १५,००० तासांपर्यंत चालतो. त्याचबरोबर ह्यात यूजर्सना १६० लाख रंगांमध्ये निवडण्याची सुविधाही मिळेल. ह्याचाच अर्थ असा की, हा १६० लाख रंगात उपलब्ध होईल.
ह्या बल्बला लाँच करताना Cube 26 ला को-फाउंडर आणि सीईओ सौरव कुमार ने सांगितले की, “ह्या IOTA Lite बल्बसह आम्ही भारतात IOT विभागात पाऊल ठेवत आहोत. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की, स्मार्टफोन प्रकाराला अधिक यशस्वी बनविण्यासाठी लाइटिंग सर्वात महत्त्वाची आहे. हा बल्ब भारतीय बाजारात आल्यानंतर लाइटिंगचा अनुभवही बदलणार आहे.”
ह्या बल्बचा आपल्या घरात सामान्य वापरासाठीही उपयोग होऊ शकतो. मात्र जर तुम्हाला हा आपल्या फोनने चालवायचा असेल आणि लायटिंगचा अनुभव बदलायचा असेल तर, आपल्याला आपल्या फोनवर एक अॅप डाऊनलो़ड करावा लागेल. त्यानंतर हा बल्ब त्या अॅपशी कनेक्ट करावा लागेल आणि मग ह्यात दिल्या गेलेल्या १६० लाख रंगांमध्ये आपल्याला एखादा रंग निवडायचा आहे आणि मग त्याच रंगात तुमचा बल्बपण पेटेल. त्यानंतर आपण आपल्या फोननेच हा चालू किंवा बंद करु शकता. त्यासाठी तुम्हाला स्विच बोर्डकडे जाण्याची गरज नाही. आपण ह्याला ब्लूटुथच्या माध्यमातून कुठूनही वापरु शकता. ह्या बल्बच्या किंमतीप्रमाणे त्यात तितकी वैशिष्ट्येही दिली गेली आहेत, जसे की कॉल आणि SMS अलर्ट. आणि जेव्हा आपल्याला मोबाईलवर फोन येईल तेव्हा बल्बचाही रंग बदलेल.