Crowdstrike Update: जगभरातील बँकिंग सेवांपासून ते फ्लाइटपर्यंत सर्व सेवा प्रभावित, महत्त्वाच्या सर्व्हिसेस ऑफलाईन
सर्व्हिसेस बंद झाल्यामुळे Microsoft 365 वापरकर्ते जगभरातील अनेक ॲप्स आणि सेवांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.
क्लाउड सर्व्हिस आउटेज आज पहाटे 3:26 वाजता सुरू झाले.
दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक विमानतळांवर परिणाम
Crowdstrike Update: Microsoft ने अलीकडेच सांगितले की, सर्व्हिसेस बंद झाल्यामुळे Microsoft 365 वापरकर्ते जगभरातील अनेक ॲप्स आणि सेवांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. कंपनीच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस पेजनुसार, त्यांच्या Azure बॅकएंड वर्कलोडच्या एका भागामध्ये ‘कॉन्फिगरेशन बदल’ मुळे “स्टोरेज आणि कंप्युट रिसोर्सेस दरम्यान आउटेज” होत आहे, ज्यामुळे अनेक Microsoft 365 ॲप्स निरुपयोगी झाले आहेत.
कोणत्या Apps वर झाला परिणाम?
कंपनीचे हेल्थ स्टेटस पेज सूचित करतो की, क्लाउड सर्व्हिस आउटेज आज पहाटे 3:26 वाजता सुरू झाले आणि सध्या ‘सर्व्हिस डिग्रेडेशन’ अनुभवत आहे. Microsoft ने Microsoft Defender, Intune, OneNote आणि SharePoint Online सारख्या काही सर्व्हिसेस पुनर्संचयित केल्या आहेत, असे दिसत आहे. परंतु PowerBI, Fabric, Teams, Purview आणि Viva Engage सारखी टूल्स अजूनही बंद आहेत.
मायक्रोसॉफ्टने ही समस्या पटकन मान्य केली आणि म्हटले, “आमची इंजिनियरिंग टीम या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत.” कंपनीने असेही नमूद केले आहे की, लक्षणांमध्ये फॉल्कन सेन्सरशी संबंधित ब्लू स्क्रीन एरर अनुभवणारे होस्ट सामील आहेत.
जगभरातील हवाई वाहतुकीवर परिणाम
क्लाउड सेवेचा मध्य अमेरिकन प्रदेशातही परिणाम झाला, ज्यामुळे फ्रंटियर Airlines सारख्या अनेक विमान कंपन्यांनी 147 उड्डाणे रद्द केली. तर, 212 फ्लाईट्स लेट केल्या. सन कंट्री आणि एलिजिअंट यांनी देखील सांगितले की, त्यांना त्यांच्या एकूण फ्लाइट्सपैकी अनुक्रमे 45% आणि 276% विलंब करावा लागला.
दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक विमानतळांवर परिणाम
यानंतर अनेक विमानांना टेक ऑफ करण्यापूर्वीच जमिनीवर थांबवावे लागले. या सगळ्या दरम्यान, आकासा एअर, इंडिगो आणि स्पाइसजेट एअरलाईन्सने प्रवाशांसाठी ॲडव्हायजरी जारी केल्या आहेत. इंडिगोने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस एररमुळे आमच्या सिस्टमवर परिणाम झाला आहे. त्यामुळे फ्लाइट बुकिंग, चेक इन, बोर्डिंग पास आणि काही फ्लाइट्सवरही परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक विमानतळांवर दिसून येत आहे.”
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile