तुम्ही क्रिकेटच्या नव्या उत्सवासाठी तयार आहेत का? काही दिवसांपूर्वी भारतात IPL 2019 ची समाप्ती झाली आहे. थोड्याच दिवसांनी आज पासून वर्ल्ड कप 2019 म्हणजे क्रिकेटच्या नव्या उत्सवाची सुरवात झाली आहे. आज क्रिकेट वर्ल्ड कप 2019 ची पहिली मॅच होणार आहे, हि मॅच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड मध्ये लंडन मधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळली जाणार आहे. त्यानंतर पुढील मॅच म्हणजे 31 मे ला होणारी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 ची दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम मध्ये खेळली जाईल.
तसेच त्यानंतर पुढील क्रिकेट मॅच 1 जून 2019 ला खेळली जाईल, जी न्यू झीलंड आणि श्रीलंका मध्ये सोफिया गार्डन्स, कार्डिफ मध्ये खेळली जाईल आणि त्याच दिवसही अजून एक मॅच असेल जी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान अशी असेल हि मॅच कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल मध्ये होणार आहे. याचा अर्थ एकाच दिवशी या दोन मॅच खेळल्या जातील.
विशेष म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप 2019 ची सुरवात आज म्हणजे 30 मे ला होऊन 14 जुलै पर्यंत हा उत्सव चालेल. हि संपूर्ण शृंखला तुम्ही लाइव पण बघू शकता. याचा अर्थ असा कि तुम्ही प्रत्येक बॉल लाइव बघू शकता. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत कि तुम्ही वर्ल्ड कप 2019 कशाप्रकारे लाइव बघू शकता.
भारतात कशाप्रकारे बघाव्या क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या सर्व मॅच ऑनलाइन
भारतात क्रिकेट वर्ल्ड कप 2019 चे भारतात ब्रॉडकास्ट राईट स्टार इंडिया कडे आहेत, तसेच स्टार स्पोर्ट्स ऑफिसियल वर तुम्हाला या सर्व मॅच भारतात बघायला मिळतील. तुम्ही ऑनलाइन स्टार इंडियाच्या ऍप वर जाऊन किंवा टीवी वर क्रिकेट पॅक मध्ये स्टारचा पॅक घेऊन ऑनलाइन सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या मॅच बघू शकता, मग तुम्ही कुठेही असा किंवा कोणतीही वेळ असो. तुम्ही कधीही मॅच स्टार इंडियाच्या ऍप वर जाऊन बघू शकता, आणि टीवी वर तुम्ही स्टारचे पॅक घेऊन ऑनलाइन सर्व क्रिकेट मॅच 2019 बघू शकता.
पण जर तुमच्याकडे स्टारचे एक्सेस नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला फक्त हॉटस्टार वर जावे लागेल, आणि या ऍप वर तुम्हाला साइन इन करावे लागेल, याचा अर्थ असा कि तुम्ही याच्या माध्यमातून वर्ल्ड कप 2019 च्या सर्व मॅच कधीही बघू शकता. पण हे तुमच्यासाठी फ्री नाही यासाठी तुम्हाला थोडे पैसे द्यावे लागतील. विशेष म्हणजे एका महिन्यासाठी तुम्हाला या ऍपच्या एक्सेस साठी Rs 299 द्यावे लागतील, तसेच तुम्हाला जर एका वर्षाची सेवा घ्यायची असेल Rs 999 द्यावे लागतील.