कोर्निंग ने आपली नवीन गोरिला ग्लास 5 लाँच केली आहे. असे सांगितले जातय की, ह्या नवीन ग्लास ला जगभरातील असंख्य प्रोडक्ट्समध्ये वापरले जाईल.
ही ग्लास दैनंदिन कामकाजाला समोर ठेवून बनवली गेली आहे. आपला फोन नेहमी कुठे ना कुठे पडतच असतो. त्यामुळे अनेकदा आपले नुकसानही होते. त्यामुळे आता ह्या ग्लासमुळे आपल्याला चिंता करण्याची काहीच गरज नाही. ह्या ग्लासचे डिझाईन असे काही बनवले गेले आहे की, जवळपास १.५ मीटर अंतरावरुन फोन पडला तरीही त्याच्या डिस्प्लेचे कोणतेही नुकसान होणार नाही.
हेदेखील पाहा – [ Marathi] HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ
कोर्निंग गोरिल्ला ग्लास जगातील जवळपास ४.५ मिलियन डिवायसेसमध्ये वापरले जाणार आहे आणि ह्याला जवळपास, ४० मोठ्या ब्रँड्सच्या १८०० प्रोडक्टमध्ये सुद्धा वापरले जाईल.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
अलीकडेच केलेल्या एका परीक्षणात असे समोर आले आहे की, जवळपास ८५ टक्के लोकांचा फोन कुठे ना कुठे हातातून पडतच असतो. त्याचबरोबर ५५ टक्के लोकांच्या हातातून तीन पेक्षा जास्त वेळा फोन हातातून पडत असतो. त्यामुळे अशा लोकांसाठी ही ग्लास खूपच फायद्याची ठरणार आहे.
हेदेखील वाचा – आयडिया पुन्हा एकदा कमी केले आपले डाटा रेट्स
हेदेखील वाचा – नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये असणार 2K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर?