पुढील स्टेप्सना फॉलो करून JioCinema फ्री सब्स्क्रिप्शन ऍक्टिव्हेट करा.
अलीकडेच Jio ने JioCinema प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. यासोबत, बराच कंटेंट प्लॅटफॉर्मवर मोफतमध्ये बघण्यासाठी उपलब्ध आहे. आता युजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आणखी एक ऑफर आणली आहे. कंपनी भारतातील VOOT Select युजर्सना तब्बल 6 महिन्यांसाठी मोफत JioCinema प्रीमियम सबस्क्रिप्शन देत आहे. खरं तर, JioCinema आणि VOOT चे विलीनीकरण आता शेवटच्या टप्प्यात आलेले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
'अशा'प्रकारे ऑफरचा लाभ घ्या.
JioCinema च्या फ्री सबस्क्रिप्शनसाठी VOOT Select युजर्सना JioCinema च्या वेबसाईटवर वर जाऊन पेमेंट डिटेल्स द्यावे लागतील. पुढील स्टेप्सना फॉलो करून JioCinema फ्री सब्स्क्रिप्शन ऍक्टिव्हेट करा.
– सर्वप्रथम Report an issue साठी JioCinema हेल्प सेंटरवर जा.
– येथे आपली इमेल ID आणि नंबर एंटर करा ज्याने तुम्ही VOOT Select सबस्क्रिप्शन केले होते.
– VOOT मेंबरशिप डिटेलमध्ये एंटर करा.
– यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. आता तुमच्या इमेलवर प्रोमो कोड येईल.
लक्षात घ्या की, VOOT जून महिन्याच्या शेवटपर्यंत सिलेक्ट युजर्सना प्रोमो कोड पाठवणार आहे.
JioCinema प्रीमियम प्लॅनची किमंत
JioCinema प्रीमियम प्लॅनची किंमत 999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या प्लॅनची वैधता संपूर्ण 1 वर्षाची आहे. सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला JioCinema ऍप वर लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाइल विभागात 'Subscribe Now' चा पर्याय दिसेल. यावर टॅप करा आणि JioCinema वरील जबरदस्त कंटेंटचा लाभ घ्या.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.