तब्बल चार वर्षानंतर CID सिरीयल येणार का प्रेक्षकांच्या भेटीला ? ‘या’ पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष…

तब्बल चार वर्षानंतर CID सिरीयल येणार का प्रेक्षकांच्या भेटीला ? ‘या’ पोस्टने वेधले चाहत्यांचे लक्ष…
HIGHLIGHTS

CID सिरीयल येणार का प्रेक्षकांच्या भेटीला ?

"कुछ तो गडबड है दया" या डायलॉगचा मोठा चाहतावर्ग

शिवाजी साटम यांनी CID गॅंगसोबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली

2018मध्ये तब्बल 21 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर SONY टीव्हीवरील CID या जबरदस्त मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, आता चार वर्षांनी ही मालिका परत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या, मालिकेचा आणि विशेष म्हणजे "कुछ तो गडबड है दया" या डायलॉगचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये ही मालिका परत सुरु होणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत. 

हे सुद्धा वाचा : तारीख नोट करा! भारतातील सर्वात स्वस्त 'मेड इन इंडिया' 5G स्मार्टफोन, 'या' तारखेपासून सुरू होणार विक्री

काही महिन्यांपूर्वी अभिनेते शिवाजी साटम म्हणजेच सर्वांचे लाडके 'ACP प्रद्युमन' यांनी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर मालिकेच्या शूटिंगसंदर्भात कोणतीच अपडेट समोर आली नाही. त्यानंतर आता, शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी CID टीम सोबत फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivaji Satam (@shivaaji_satam)

या फोटोमध्ये सिरीयलचे क्रिएटर बीपी सिंह दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत ऑफिसर दया आणि ऑफिसर अभिजीतचे पात्र निभावणारे कलाकारदेखील दिसत आहेत. या फोटोला त्यांनी "बिग डॅडी बीपीसोबत CIDची गॅंग" असे कॅप्शन देखील दिले आहे. 

या फोटोमुळे CID लव्हर्समध्ये पुन्हा उत्सुकता दिसून येत आहे. या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना बघायला मिळतोय. लवकरच ही मालिका परत घेऊन या म्हणून चाहते मागणी करत आहेत. 2018 मध्ये मालिका बंद झाल्यानंतर 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा CID चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं, तेव्हादेखील मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo