Christamas Gift Ideas 2024: ख्रिसमस गिफ्टसाठी बेस्ट आहेत ‘हे’ गॅजेट्स, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत

Christamas Gift Ideas 2024: ख्रिसमस गिफ्टसाठी बेस्ट आहेत ‘हे’ गॅजेट्स, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत
HIGHLIGHTS

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो.

बहुतांश ऑफीसमध्ये हा दिवस सिक्रेट सॅन्टा बनून साजरा केला जातो.

तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीत पुढील गॅजेट्स गिफ्ट म्हणून देऊ शकता.

Christamas Gift Ideas 2024: आपणा सर्वांना माहितीच आहे की, दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. या सणाला ख्रिसमस ट्री डेकोरेट करून आपले कुटुंबिय आणि मित्र परिवारासह हा सण साजरा करतात. या दिवशी, लोक सांता म्हणून कपडे घालतात आणि त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना भेटवस्तू देतात. आपणा सर्वांना माहितीच आहे की, केवळ कुटुंबासोबतहा नाही तर ख्रिसमस सेलिब्रेशन हा ऑफिस कल्चरचाही आता महत्त्वाचा भाग बनला आहे.

Also Read: Poco C75 5G Vs Moto G35 5G: दोन्ही लेटेस्ट बजेट स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त स्पर्धा, कोण आहे Best?

आम्ही तुम्हाला सांगतो की, बहुतांश ऑफीसमध्ये हा दिवस सिक्रेट सॅन्टा बनून साजरा केला जातो. सिक्रेट सॅन्टा बनून तुम्हाला तुमचे नाव न सांगता तुमच्या सहकाऱ्यांना भेटवस्तू द्याव्या लागतात. जर तुम्हालाही या ख्रिसमससाठी गिफ्ट आयडियाज हवे असतील तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीत पुढील गॅजेट्स गिफ्ट म्हणून देऊ शकता.

boAt Airdopes Alpha Wireless Earbuds

boAt चे एअरडोप्स Amazon वर सध्या 798 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आले आहे. ही डील मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. या बड्समध्ये क्रिस्टल क्लिअर साउंड आणि मजबूत बास मिळेल. इअरबड्समध्ये ENx तंत्रज्ञान देखील समाविष्ट आहे, जे ड्युअल माइक सेटअपमुळे उत्तम कॉल कॉलिटी मिळेल. नवीन इअरबड्स ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतात आणि टच कंट्रोलसह येतात. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Christamas Gift Ideas 2024 (image credit: pexels)

pTron Reflect Pro स्मार्टवॉच

pTron Reflect Pro स्मार्टवॉच Amazon वरून 849 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टवॉचचा लूक अगदी Apple Watch ultra सारखा आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या वॉचमध्ये 1.85 इंच लांबीचा टच डिस्प्ले आहे. तसेच, यात 8 सक्रिय स्पोर्ट्स मोड दिले गेले आहेत. क्विक मेन्यू ड्युअल स्क्रीन, SOS, सोशल मीडिया नोटिफिकेशन्स, व्हॉइस असिस्टंट यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. यात ब्लूटूथ कॉलिंगसारखे अनेक प्रगत फीचर्स आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

ZEBRONICS MB10000S6 Power Bank

ZEBRONICS MB10000S6 पॉवर बँक Amazon वरून 668 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही पॉवर बँक 10,000mAh पॉवर क्षमतेसह येते. यामध्ये 12W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट उपलब्ध आहे. ही डील सुद्धा मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. सुसंगत उपकरणांच्या श्रेणी चार्ज करण्यासाठी योग्य, पॉवर बँक 10W चे आउटपुट देऊ शकते. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo