जर तुम्हाला असं वाटत असेल की, सुपरनॅचरल कॅरेक्टर किंवा सबजेक्टवर रियलिस्टिक आणि जबरदस्त चित्रपट बनवणे हॉलीवूडचा एकाधिरकर आहे. तर 'चिंता मणी' चा ट्रेलर बघून तुम्हाला यावर पुनर्विचार करावा लागणार आहे. कहाणीकार सुधांशू राय आणि सेंट्स आर्टच्या बॅनरखाली निर्मित 'चिंता मणी' हा असाच एक कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये काही अलौकिक घटन घडतात.
हे सुद्धा वाचा : जबरदस्त ! Dell ने भारतात लाँच केला नवीन लॅपटॉप, मिळेल 4K रेझोल्युशन स्क्रीन
सुधांशू राय, शोभित सुजय, अभिषेक सोनपालिया आणि अखलाक अहमद (आझाद) अभिनीत जवळपास अर्ध्या तासाचा हा चित्रपट पुनीत शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याने यापूर्वी चायपत्ती आणि डिटेक्टिव्ह बुमराहमध्ये सहलेखन केले होते. चिंता मणीचा ट्रेलर कहाणीकार सुधांशू राय यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.
जवळपास 47-सेकंदाच्या ट्रेलरमध्ये तीन मित्रांना एक चमत्कारिक मणि म्हणजेच मौल्यवान दगड सापडल्याचे दाखवले आहे. जो एक रहस्यमय प्रतीत होणाऱ्या पात्रानुसार भविष्य सांगू शकतो. भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेले, हे त्रिकूट रत्न वापरण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न करत असताना या त्रिकुटाने काही अनपेक्षित घटना पाहिल्या. परंतु ते म्हणतात की, त्यांना एक अद्भुत गोष्ट मिळाली आहे. मात्र, ट्रेलर हे देखील स्पष्ट करतो की, पुढील घडामोडी त्यांच्या अपेक्षेपलीककडील आहेत आणि मणि असलेला माणूस सामान्य माणूस नाही.
कहाणीकार आणि चित्रपट निर्माते सुधांशू राय त्यांच्या आगामी OTT रिलीजवर म्हणाले, "जेव्हा आउट-ऑफ-द-बॉक्स संकल्पनांना प्रेक्षकांकडून प्रेम आणि प्रशंसा मिळते, तेव्हा ते आमच्यासाठी नेहमीच प्रोत्साहनाचे स्रोत असते. माझ्या कथांना प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेषत: आमचे मागील स्ट्रीमिंग रिलीज 'चायपत्ती' आणि 'डिटेक्टिव्ह बुमराह' या चित्रपटाच्या यशाने आम्हाला भारतीय पडद्यावर क्वचितच दिसणार्या अधिक विषयांवर प्रयोग करण्याची प्रेरणा दिली. चिंता मणी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचे वचन पूर्ण करेल, कारण यात आकर्षक पॉवर-पॅक परफॉर्मन्ससह विविध शैलींचे मिश्रण बघायला मिळणार आहे."
चिंता मणीचे लेखन सुधांशू राय यांनी केले आहे, तर फोटोग्राफीचे दिग्दर्शक स्पर्श हसिजा आहेत. या लघुपटाचे एडिट सौरभ रावत यांनी केले आहे. चित्रपटाचा पॉवर बॅकग्राउंड स्कोअर आणि साउंडट्रॅक प्रणव अरोरा (प्रोश) यांनी डिझाइन केले आहे. त्याबरोबरच, थिएटर आर्टिस्ट यश सोनी यांनी चित्रपटात कल्पनेचे रंग भरले आहेत.