‘या’ वेबसाइट्स समोर FLIPKART आणि AMAZON फेल, अर्ध्या किमतीत मिळतायेत प्रोडक्ट्स

‘या’ वेबसाइट्स समोर FLIPKART आणि AMAZON फेल, अर्ध्या किमतीत मिळतायेत प्रोडक्ट्स
HIGHLIGHTS

काही वेबसाईट्सने Amazon आणि Flipkartला टाकले मागे

वस्तू मिळतायेत अगदी निम्म्या किमतीत

बचत करण्यासाठी 'या' दोन वेबसाईट्स तुमच्यासाठी उत्तम

दिवाळीचा सण सुरु व्हायला आता फक्त काही दिवस  उरले आहेत. पण दिवाळीच्या तयारीला मात्र सर्वत्र सुरुवात करण्‍यात आली आहे. दुकानांमध्ये दिवाळीच्या खरेदी गर्दी तर बघायला मिळतचं आहे. पण ऑनलाइन शॉपिंग साईट्सवरदेखील खरेदीसाठी ही गर्दी बघायला मिळत आहे. खरं तर, ऑनलाइन शॉपिंगवर सर्वाधिक सवलत उपलब्ध आहे आणि त्यात FLIPKART आणि AMAZON हे शॉपिंग प्लॅटफॉर्म आघाडीवर आहेत. एवढेच नाही तर दोन्ही साईट्सने सणासुदीच्या वार्षिक महासेल लाईव्ह केलेले आहेत. 

हे सुद्धा वाचा : BSNL चा अप्रतीम प्लॅन! दररोज 5 तासांपर्यंत मिळेल अमर्यादित डेटा, किंमत रु. 300 पेक्षा कमी

परंतु तुम्हाला माहित आहे का की, काही वेबसाइट्सवरून या दोन्ही वेबसाइट्सपेक्षा अगदी स्वस्त दरात वस्तू मिळत आहेत. जर तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत, ज्यावर तुम्ही जवळपास अर्ध्या किमतीत वस्तू खरेदी करण्यास सक्षम असाल.

1. Shopsy

या वेबसाइटवर केवळ शॉपिंगच नाही तर पैसे देखील कमवता येतील. ही वेबसाईट अलीकडेकच समोर आली आहे आणि तेव्हापासून लोक त्यावर जोरदार शॉपिंग करत आहेत आणि बचत करत आहेत. तुम्हालाही या सणासुदीच्या शॉपिंगमध्ये बचत करायची असेल, तर तुमच्यासाठी हे सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे.

2. Meesho

मीशो हे भारतातील एक अतिशय ट्रेंडिंग शॉपिंग प्लॅटफॉर्म बनले आहे. कारण त्यावरील प्रोडक्ट्सची किंमत इतर ऑनलाइन वेबसाइटच्या तुलनेत जवळपास निम्मी असते. एवढ्या स्वस्त दरात वस्तू विकल्या जात आहेत, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कपड्यांची खरेदी असो किंवा लहान मुलांची खेळणी, प्रत्येक वस्तूवर तुम्हाला प्रचंड सवलत दिली जाते. जर तुम्ही या दिवाळीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल आणि या साईटवर तुम्हाला 50 टक्क्यांहून अधिक सूटही मिळते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo