Important! Aadhaar Card मध्ये बदल करण्यासाठी द्यावे लागतील पैसे? बघा नव्या वर्षातील नवे नियम। Tech News  

 Important! Aadhaar Card मध्ये बदल करण्यासाठी द्यावे लागतील पैसे? बघा नव्या वर्षातील नवे नियम। Tech News  
HIGHLIGHTS

Aadhaar Card पासून ते ITR भरण्यापर्यंतच्या अनेक नियमांमध्ये बदल

ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 होती.

नव्या नियमांनुसार काम केले नाही तर, दंड देखील आकारले जाईल.

कालपासून 2024 या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षाच्या आगमनासह महत्त्वाच्या कामासाठीचे अनेक नियम देखील बदलले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही नियमांबद्दल माहिती देणार आहोत, जे माहित असणे तुमच्‍यासाठी खूप आवश्‍यक आहे. लक्षात घ्या की, Aadhaar Card पासून ते ITR भरण्यापर्यंतच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. चला तर मग सर्व महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेऊयात-

Aadhaar Card साठी शुल्क

जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. यापूर्वी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नव्हते. 31 डिसेंबर 2023 पर्यंत आधार पूर्णपणे मोफत अपडेट करता येत होते. मात्र, 1 जानेवारी 2024 पासून, तुम्हाला कोणताही बदल करण्यासाठी 50 रुपये द्यावे लागतील. आधार कार्डबाबत हा नवा नियम आला आहे.

हे सुद्धा वाचा: Revealing! Samsung Galaxy S24+ मध्ये मिळेल AI फिचर, डिटेल्स आणि Pre-Order ऑफर लिस्टिंगमध्ये लीक। Tech News

aadhaar card
Aadhar Card

ITR भरण्याच्या नियमात बदल

ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 होती. जर तुम्ही मुदतीआधी असे केले नाही तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ITR उशीरा भरल्यास 5,000 रुपयांचा दंडही होऊ शकतो. हा दंड 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी आहे, तर 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या वापरकर्त्यांना 1,000 रुपये दंड आकारला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

SIM Card

सिमकार्डबाबतच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. आता सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला ई-व्हेरिफिकेशन करावे लागेल. लक्षात घ्या की, याशिवाय सिमकार्ड दिले जाणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा नियमही 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, सिमकार्ड देण्यापूर्वी संपूर्ण तपासणी केली जाईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo