CHANDRAYAAN 2 UPDATE: ISRO चे मोठे यश, चंद्राच्या कक्षेत पोहोचला चंद्रयान-2

Updated on 21-Aug-2019
HIGHLIGHTS

7 सप्टेंबर पर्यंत Chandrayaan 2 पोहोचेल लूनर साउथ पोल वर

हि मोहीम यशस्वी झाल्यास भारत बनेल चौथा देश

Chandrayaan 2 moon mission यशस्वी होताना दिसत आहे. ISRO ने अशी माहिती दिली आहे कि Chandrayaan 2 मंगळवारी यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत (Lunar Orbit) पोहोचला आहे. India moonshot Chandrayaan 2 जवळपास 30 दिवसांच्या अवकाश प्रवासानंतर आता चंद्राच्या कक्षेत पोहोचला आहे.याची माहिती इसरो ने आपल्या ट्विटर हँडल द्वारे पण दिली आहे. 
 

https://twitter.com/isro/status/1163670742908563456?ref_src=twsrc%5Etfw

इसरो नुसार हा मोहिमेचा कठीण बघ होता ज्यात त्यांना यश मिळाले आहे. यान जर चंद्रावर वेगाने गेले तर ते आढळण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर यान अवकाशात हरवू शकते. तसेच जर वेग कमी झाला आणि याच मंद वेगाने यान पोहोचले तर चंद्राचे गुरुत्वाकर्षण (gravity) Chandrayaan 2 ला स्वतःकडे खेचून घेईल आणि यान चंद्रावर पडेल. पण योग्य वेग सांभाळत इसरो ने यश मिळवले आहे. 
 

https://twitter.com/isro/status/1163675516898910209?ref_src=twsrc%5Etfw

22 जुलैला चंद्रयान-2 आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा मधील प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित केला गेला होता. खास बाब अशी कि जर हि चंद्र मोहीम यशस्वी झाली तर असे करणारा भारत चोथा देश ठरेल ज्याने चंद्राच्या जमिनीवर रोवर पोहोचवला आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने हि कामगिरी केली आहे. 

चंद्राच्या कक्षेत परिभ्रमण केल्यानंतर चंद्रयान 2, 7 सेप्टेंबरला लूनर साउथ पोल वर उतरेल. 22 जुलैला जीएसएलवी मार्क…-एम 1 द्वारे चंद्रयान-2 प्रक्षेपित केला गेला होता. चंद्रयान-2 ने 14 ऑगस्टला पृथ्वीच्या कक्षेतून निघून चंद्राकडे जाण्याच्या प्रवासाला सुरवात केली. 

 

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :