ISRO ने अशी माहिती दिली आहे कि सॅटेलाइट चंद्रयान-2 ने मून मिशन दरम्यान चंद्राचे पहिले छायाचित्र पाठवले आहे. स्पेस एजेंसी ISRO नेनुकतीच हि माहिती आपल्या ट्वीट पोस्ट द्वारे दिली आहे. इसरो नुसार चंद्राच्या भूभागापासून जवळपास 2,650 किमी उंचीवरून फोटो घेण्यात आला आहे. कॅप्चर केलेल्या फोटो मध्ये चंद्रावरील दोन खास जागा दाखवण्यात आल्या आहेत ज्यात Apollo crater आणि Mare Orientale चा समावेश आहे.
याविषयी इसरो अध्यक्ष सिवन म्हणाले कि सध्या चंद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत परिभ्रमण करत आहे. तसेच चंद्राच्या भूभागावर सॉफ्ट लँडिंग लँडर विक्रम द्वारे 7 सप्टेंबरला केली जाईल. यानंतर 2 सप्टेंबरला लँडर ऑरबिटर पासून वेगळा होईल आणि हि माहिती पण ISRO चीफ ने दिली आहे.
https://twitter.com/isro/status/1164535259561517058?ref_src=twsrc%5Etfw
सिवन या मोहिमेच्या पुढील टप्पयाविषयी बद्दल बोलले कि बेंगळुरू मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ या प्रक्रियेत सहभागी होतील. 7 सप्टेंबरला 1:55 वाजेपर्यंत हि प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. सिवन यांच्या मते रात्री जवळपास 1:40 वाजता सॉफ्ट लँडिंग केली जाईल रात्री 1.55 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
याआधी इसरो ने असे सांगितले होते कि चंद्रयान-2, 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या परिभ्रमण करू लागला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दुसऱ्यांदा चंद्राच्या कक्षेत पुढे गेला.
ISRO नुसार 2 सप्टेंबरला लँडर ऑर्बिटर पासून वेळगे झाल्यानंतर चंद्राच्या आसपास 100 किलोमीटर X30 किलोमीटरच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्रात ‘सॉफ्ट लँडिंग' ची प्रक्रिया सुरु केली जाईल. रिपोर्ट्स नुसार इसरोच्या अध्यक्षांनी प्रधानमंत्र्यांना सॉफ्ट लँडिंग बघण्यास आमंत्रित केले आहे.