CG Slate gamified लर्निंग टॅबलेट भारतात लाँच केला आहे. भारतीय बाजारात ह्या टॅबलेटची किंमत ८.४९९ रुपये आहे. हा टॅबलेट ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनी पहिल्या १००० यूजर्सला हा टॅबलेट ७,४९९ रुपयाच्या आकर्षक किंमतीत देत आहे.
ह्या टॅबलेटमध्ये NCERT चे करिकुलम आहे. हा एक सेल्फ लर्निंग टॅबलेट आहे. ह्याला लहान मुलांना लक्षात घेऊन बनवले आहे. ह्यामध्ये मुले खेळामधूनच विविध गोष्टी शिकतात.
ह्या टॅबलेटमध्ये 7 इंचाची IPS डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. ह्यात मिडियाटेक MT8127 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आहे.
ह्यात 1GB ची रॅम दिली आहे. हा 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. ह्यात 3450mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स
हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्यात 2 मेगापिक्सेचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा सुद्धा आहे.
हेदेखील वाचा – लेनोवो Y700 गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच, किंमत ९९,९९० रुपये
हेदेखील वाचा – नासा: जूनो यानाने अखेर यशस्वीरित्या केला गुरुकक्षेत प्रवेश