ह्याचे आयोजन ६ ते ९ जानेवारीपर्यंत अमेरिकेत लास वेगसमध्ये केले जाणार आहे. हा कार्यक्रम ४ दिवस चालेल आणि ह्यात अनेक छोट्या-मोठ्या टेक कंपन्या सहभागी होतील. ह्या शोमध्ये अनेक प्रकारचे गॅजेट्स आणि तंत्रज्ञान पाहायला मिळेल.
खूप लवकरच वर्षातील पहिला कार्यक्रम CES (कन्ज्यूमर इलेक्ट्रॉनिक शो) चे आयोजन होणार आहे. ह्याचे आयोजन ६ ते ९ जानेवारीपर्यंत अमेरिकेत लास वेगसमध्ये केले जाणार आहे. हा कार्यक्रम ४ दिवस चालेल आणि ह्यात अनेक छोट्या-मोठ्या टेक कंपन्या सहभागी होतील. ह्या शोमध्ये अनेक प्रकारचे गॅजेट्स आणि तंत्रज्ञान पाहायला मिळेल.
ट्विटरवर शो चे पेज@CES च्या नावाने बनवले गेले आहे. तर ट्रेडिंगसाठी #CES2016 आणि #Vegas चा वापर केला जात आहे. ह्या कार्यक्रमात असे काही गॅजेट्ससुद्धा पाहायला मिळतील, ज्याविषयी सर्वसामान्य माणसाने विचारही केला नसेल. तथापि, हा अशा टेक्नॉलॉजी वरुन पडदा उठवेल, ज्याने आपले जीवन खूपच सोपे होईल.
काय होणार २०१६ च्या ह्या कार्यक्रमात?
१. ह्यात सॅमसंग, सोनी, LG सह ३,६०० पेक्षा जास्त कंपन्या आपल्या गॅजेट्सला सादर करतील.
२. कार्यक्रमादरम्यान अनेक कॉन्फ्रेंस आणि डिबेट होईल, ज्यात नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीवर चर्चा होईल.
३. ह्या शोमध्ये सॅमसंग स्मार्ट WELT असलेला लॅपटॉप सादर करु शकतो.
४. BMW ह्या शोमध्ये फ्यूचर ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करु शकते.
५. टोयटा येथे आपली सेल्फ ड्रायव्हिंग कार सादर करु शकते.
६. Fitbit येथे फिटनेस ट्रॅकरचे प्रदर्शन करु शकते.
पहिला CES न्यूयॉर्कमध्ये १९६७ साली आयोजित केला गेला होता. १९७८ पासून १९९४ दरम्यान ह्या कार्यक्रम केवळ दोनदाच आयोजित केला गेला. मात्र २००४ नंतर ह्या टेक शो चे प्रत्येक वर्षी आयोजन केले जातेय.