Lenovo टॅबलेट्सवर मिळतोय मोठ्या प्रमाणात Discount! किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी, पहा यादी

Updated on 28-Nov-2024
HIGHLIGHTS

Amazon प्रसिद्ध टेक कंपनी Lenovo च्या टॅबलेट्सवर प्रचंड सवलत

Lenovo Tab M11 टॅबलेट तुम्हाला 20,000 अंतर्गत खरेदी करता येईल.

SBI बँक कार्डद्वारे टॅब खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट देखील मिळेल.

सध्या Amazon वर Mega Electronics Days सेल सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सेल 21 नोव्हेंबरला सुरू झाली असून 28 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, आता तुम्हाला घाई करावी लागेल कारण उद्या या सेलचा शेवटचा दिवस आहे. सेल दरम्यान तुम्हाला सर्व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर 80% पर्यंत सूट मिळेल. जर तुम्ही स्वत:साठी नवीन टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Lenovo टॅबवर उत्तम डील्स आणि ऑफर्स सुरु आहेत. पाहुयात 20 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध सर्वोत्तम Lenovo टॅबलेट्स-

Also Read: Best Gaming Phones Under 15000: स्वस्त किमतीत गेमिंगसाठी 5 सर्वोत्तम फोन्स उपलब्ध, पहा यादी

Lenovo Tab M11

Lenovo Tab M11 टॅबलेटचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 17,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबवर SBI बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची सूट मिळेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये 11 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. तसेच, यात 8MP फ्रंट कॅमेरा आणि मागील बाजूस 13MP चा कॅमेरा उपलब्ध आहे. ऑडिओसाठी टॅबमध्ये क्वाड स्पीकर देखील देण्यात आले आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Lenovo Tab Plus

Lenovo Tab Plus टॅबलेटचे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 21,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे टॅब खरेदी केल्यास तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळेल. तर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये 11.5 इंच लांबीचा 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Mediatek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात फक्त 8MP रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या टॅबमध्ये 8600mAh बॅटरी आहे, जी 45W चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Lenovo Tab P11

Lenovo Tab P11 टॅबलेटचे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वरून 18,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये 10.61 इंच लांबीचा 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, टॅब Mediatek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ऑडिओसाठी, टॅबमध्ये 4 स्पीकर प्रदान केले आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :