Room Heaters Deals: भारतात अखेर गारठा पडायला सुरुवात झाली आहे. तुम्ही पाहू शकता की, बाहेर जाताना लोक आता थंडीपासून बचाव करण्यासाठी शाल, जॅकेट इ. सर्व वापरतात. कुणा-कुणाला तर घरात सुद्धा गारवा सहन होत नाही. त्यामुळे आता रूम हीटरचा वापर देखील सुरू झाला आहे. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये स्वत:साठी नवीन हीटर शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या ब्रँडेड रूम हीटर्सबद्दल सांगणार आहोत. हे हिटर्स तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.
Also Read: Black Friday Sale 2024: प्रसिद्ध Samsung कंपनीच्या प्रोडक्ट्सवर मिळतोय भारी Discount, पहा ऑफर्स
हे रूम हीटर विशेषतः रूम्ससाठी तयार करण्यात आले आहे. या उपकरणाची किंमत 1,563 रुपये आहे. तुम्ही फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या हीटरमध्ये 3 एअर सेटिंग्ज आहेत, ज्यामध्ये कूल, वॉर्म आणि हॉट समाविष्ट आहे. अति उष्णतेची समस्या दूर करण्यासाठी यात स्वयंचलित शट ऑफ फंक्शन देखील देण्यात आले आहे. याशिवाय, हीटरमध्ये एक पॉवरफुल मोटर आणि LED इंडिकेटर देखील आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
हॅवेल्सचा हा रूम हीटर कॉम्पॅक्ट साईजचा आहे. या उपकरणाची किंमत 1,999 रुपये इतकी निश्चित आहे. कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे हे उपकरण सहज कुठेही नेले जाऊ शकते. मुलांच्या सुरक्षेचा विचार करून त्याच्या समोर लोखंडी ग्रील देखील बसवण्यात आली आहे. या हीटरमध्ये 400 आणि 800W च्या दोन हीटिंग सेटिंग्ज आणि रॉड्स आहेत, जे वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार वापरू शकतात. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
ओरिएंट इलेक्ट्रिक अरेवा पोर्टेबल रूम हीटर हे Amazon India वरून 1,449 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. या उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते हिवाळ्यात गरम हवा आणि उन्हाळ्यात थंड हवा सोडते. हे दोन्ही हंगामात वापरले जाऊ शकते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या हीटरमध्ये 2300 RPM मोटर बसवण्यात आली आहे, जी 100% तांब्यापासून बनलेली आहे. यात प्रत्येकी 1000W चे दोन हीटिंग घटक देखील आहेत. याशिवाय हिटरच्या पुढील बाजूस सेफ्टी ग्रिलही बसवण्यात आले आहे. तसेच, या उपकरणावर 1 वर्षाची वॉरंटी उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.