Apple लव्हर्स! iPad वर पहिल्यांदाच मिळतेय भारी सूट, फक्त 9,000 मध्ये खरेदी करण्याची संधी

Apple लव्हर्स! iPad वर पहिल्यांदाच मिळतेय भारी सूट, फक्त 9,000 मध्ये खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

Apple iPad (9th Gen) वर प्रचंड मोठी सवलत

11% डिस्काउंटसह हा iPad फ्लिपकार्टवर उपलब्ध

Only WiFi Model वर ही सवलत दिली जाणार आहे.

Apple लव्हर्ससाठी एक अप्रतिम ऑफर आणण्यात आली आहे. Apple iPad वर पहिल्यांदाच एवढी मोठी सवलत मिळत आहे. Apple चा महागडा iPad तुम्हाला तुमच्या बजेट किमतीत खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही Apple प्रेमी आहात, तर ही संधी अजिबात गमावू नका. साधारण किंमत बघून ग्राहक हे उपकरण खरेदी करणे टाळतात, पण आता तुम्ही या ऑफरवर एक नजर नक्की घातली पाहिजे. 

Apple iPad (9th Gen) वरील ऑफर 

Apple iPad (9th Gen) ची MRP फ्लिपकार्टवर 33,900 रुपये आहे. मात्र, 11% डिस्काउंटसह हा iPad साईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या डिस्काउंटसह Apple iPad 29,900 रुपयांना साईटवर सूचिबद्ध करण्यात आला आहे. याशिवाय, यावर काही बँक ऑफर्सदेखील ग्राहकांना मिळतील. फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. 

विशेष म्हणजे तुम्हाला या iPadच्या एक्सचेंजवर प्रचंड मोठी सवलत दिली जात आहे. जर तुमच्याकडे एखादा जुना स्मार्टफोन आहे तर तुम्हाला यासोबत एक्सचेंज केल्यास 20,000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. मात्र, ही सवलत संपूर्ण मिळवण्यासाठी तुमचा फोन उत्तम स्थितीत हवा आणि मॉडेल देखील लेटेस्ट हवे असणार आहे. ही डील तुमच्यासाठी खूप परवडणारी ठरणार आहे. 

 Apple iPad (9th Gen) 

 Apple iPad (9th Gen) मध्ये तुम्हाला 10.2 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच यामध्ये 8MP प्रायमरी रियर कॅमेरा देखील दिला जातो. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तुम्हाला सांगतो की ही किंमत Only WiFi Model ची आहे. कंपनी फोनवर एक वर्षाची वॉरंटी देत आहे. आज ऑर्डर केल्यास तुम्हाला हा iPad उद्यापर्यंत मिळून जाईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo