केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कार्यकाळातील पाचवा पूर्ण अर्थसंकल्प आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. मोबाईल फोनच्या विक्रीला चालना देण्यासाठी कॅमेरा लेन्स आणि इतर घटकांवरील सीमाशुल्क कमी करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच, लिथियम-आयन बॅटरीवरील कस्टम ड्युटी सवलत वाढवली जाईल. म्हणजेच लिथियम आयन बॅटरी असलेली इलेक्ट्रिक वाहनेही स्वस्त होतील.
हे सुद्धा वाचा : मजबूत फास्ट चार्जिंगसह Realme चा नवीन फोन लवकरच येणार, वाचा डिटेल्स
अर्थमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक क्षेत्राबाबत सांगितले की, भारतात मोबाईलचे उत्पादन 58 दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढले आहे. कॅमेरा लेन्स, पार्ट्स, बॅटरीच्या आयातीवर सवलत म्हणजेच आयात शुल्क कमी केले जाईल. याशिवाय टीव्ही पॅनलच्या आयात शुल्कातही 2.5 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मोबाईल आणि स्मार्ट टीव्ही स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन विक्रीला चालना देण्यासाठी कॅमेरा लेन्स आणि इतर घटकांवरील सीमा शुल्क कमी केले जाईल.
पुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना असेही सांगितले की, लिथियम-आयन बॅटरीवरील कस्टम ड्युटी सवलत वाढवली जाईल. मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीवरील सीमा शुल्क बजेटमध्ये हटवण्यात आले आहे. म्हणजेच आता या बॅटऱ्याही स्वस्त होणार असून, त्याचा थेट परिणाम मोबाईलच्या किमतीवर होणार आहे.