CES 2016: ब्रॉडकॉमने केली BCM43012 Wi-Fi/Bluetooth कॉम्बो चिपची घोषणा

Updated on 06-Jan-2016
HIGHLIGHTS

ब्रॉडकॉमने असा दावा केला आहे की, ही चिप अनेक ब्लूटुथ सोल्युशनपेक्षा ८० टक्के कमी पॉवर वापरते आणि ब्रॉडकॉमच्या आधीच्या कॉम्बो चिप्सपेक्षा तीन पटीने जास्त बॅटरी लाइफ देते.

ब्रॉडकॉमने CES 2016 मध्ये BCM43012 Wi-Fi/Bluetooth low power combo chip लाँच केले. ह्या चिपमुळे कमीत कमी पॉवरचा वापर केला जाईल. ब्रॉडकॉमने असा दावा केला आहे की, ही चिप अनेक ब्लूटुथ सोल्युशनपेक्षा ८० टक्के कमी पॉवर वापरते आणि ब्रॉडकॉमच्या आधीच्या कॉम्बो चिप्सपेक्षा  तीन वेळा जास्त बॅटरी लाइफ देते.

 

पुढे दिलेले प्रेस रिलीज वाचा:

ब्रॉडकॉम कॉर्पोरेशन(NASDAQ: BRCM): सेमीकन्डक्टर सोल्यूशन्समधील जागतिक बदल घडवणा-या ब्रॉडकॉमन वायर्ड आणि वायरलेस कम्युनिकेशनसाठी, आज नवीनतम आणि कमीत कमी पॉवर वपारणारी वायफाय/ब्लूटुथ कॉम्बो चिप लाँच केली. ब्रॉडकॉमच्या आधीच्या कॉम्बो चिप्सपेक्षा  तीन पटीने जास्त बॅटरी लाइफ देते. ह्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ब्रॉडकॉमच्या न्यूजरुमला भेट द्या.

वैशिष्ट्ये आणि फायदे:

  • ह्यात उच्च एकीकृत असे 28nm ड्यूल-बँड 802.11 आणि ब्लूटुथ 4.2 SoC वापरण्यात आले आहे.

  • पुरेसे पॉवर अॅप्लीफायर(PAs), कमी आवाजाचे अॅम्प्लीफायरर्स (LNAs), आणि पॉवर मॅनेजमेंट युनिट (PMU)

  • अप्रतिम अशी कमी पॉवर जी वायफाय आणि BT साठी सक्रिय असते.

 

उपलब्धता

BCM43012 चा नमुना सध्यात अग्रगण्य अशा OEM सह मिळत आहे.

Connect On :