अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झालेल्या या चित्रपटाने रिलीजचे 25 दिवस पूर्ण केले आहेत, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर चित्रपटाने सुमारे 264.99 कोटींचे एकूण कलेक्शन केले आहे. त्याचबरोबर हा मल्टीस्टारर चित्रपट जगभर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, अयान मुखर्जीची एक पोस्ट समोर आली आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की चित्रपटाने त्याची एकूण किंमत वसूल केली आहे.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Redmi Pad टॅबलेट 90Hz रिफ्रेश रेटसह लाँच, फक्त रु. 12,999 मध्ये खरेदी करा…
अयान मुखर्जीने 410 कोटींच्या बजेटमध्ये 'ब्रह्मास्त्र'ची निर्मिती केली होती, ज्यामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनचा खर्च समाविष्ट होता. परंतु आता या चित्रपटाने आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'ब्रह्मास्त्र'ची एकूण कमाई जगभरात 425 कोटींवर गेली असून ही माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी दिली आहे. अयान मुखर्जीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर त्याच्या 'अग्नी अस्त्र'मध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे, '25 दिवसांचे बॉक्स ऑफिस वर्ल्ड वाइड कलेक्शन रु. 425 कोटी.' या कमाईसह 'ब्रह्मास्त्र' हा 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईत सातत्याने घट होत होती, मात्र वीकेंडला सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळाला आहे. शुक्रवारी या चित्रपटाने लाखोंची कमाई केली होती, मात्र चौथ्या शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटाने 23 व्या दिवशी 1.25 कोटींची कमाई केली आहे. तर, चौथ्या रविवारी चित्रपटाने 1.60 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ज्यासह वीकेंडपर्यंत, चित्रपटाने सर्व भाषांमध्ये 265.89 कोटी रुपयांची कमाई केली.