Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’ आता OTT वर धमाल करण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे बघता येईल चित्रपट…

Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’ आता OTT वर धमाल करण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे बघता येईल चित्रपट…
HIGHLIGHTS

ब्रह्मास्त्र चित्रपट आता लवकरच OTTवर रिलीज होणार

हा चित्रपट 4 नोव्हेंबरपासून डिजनी + हॉटस्टारवर रिलीज होणार

या चित्रपटाने देश-विदेशात अनेक विक्रम प्रस्थापित केले.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. रिलीज होताच या चित्रपटाने देश-विदेशात अनेक विक्रम प्रस्थापित केले. एवढेच नाही तर बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने दमदार कमाई केली. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण जर तुम्हाला हा चित्रपट अजून बघता आला नसेल तर लवकरच तुम्हाला घरी बसून मोबाईलवर हा चित्रपट बघता येईल.

हे सुद्धा वाचा : Motorola Edge 30 Ultra 256GB स्टोरेज मॉडेल भारतात लाँच, नव्या मॉडेलमध्ये काय आहे खास ?

Disney + Hotstar वर प्रदर्शित होणार चित्रपट 

थिएटरमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला हा चित्रपट पुन्हा पहायचा असेल किंवा अजून बघता आला नसेल, तर पुढच्या महिन्यापासून तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर कधीही हा चित्रपट बघू शकणार आहात. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट 4 नोव्हेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर सर्व भाषांमध्ये स्ट्रीम केला जाऊ शकतो.

9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला चित्रपट 

चित्रपटाच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना वाटेल तेव्हा पाहता येईल. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले होते. हा चित्रपट 410 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवण्यात आला होता, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे.

हा चित्रपट तीन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या दमदार यशानंतर आता चित्रपटाचे निर्माते त्याचा दुसरा भाग बनवण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात अशी अनेक कोडी आहेत, ज्याचे उत्तर मिळण्यासाठी प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर रणबीर आणि आलिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि शाहरुख खान सारखे दिग्गज कलाकार देखील दिसले.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo