रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, जबरदस्त VFX, काही तासांतच मिळाले लाखो व्युज

रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, जबरदस्त VFX, काही तासांतच मिळाले लाखो व्युज
HIGHLIGHTS

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा एकत्र पहिलाच चित्रपट

'ब्रह्मास्त्र' यावर्षी 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार

अयान मुखर्जीचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री  आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या 3 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये काही जबरदस्त सीन आणि आकर्षक VFX शॉट्स आहेत. चित्रपटाला ग्रँड बनवण्यासाठी सर्व मेहनत घेण्यात आली आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. एवढेच नाही तर स्वतः रणबीर आणि आलियादेखील या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. कारण हा त्या दोघांचा एकत्र पहिलाच चित्रपट आहे. 

हे सुद्धा वाचा : Oppo K10 5G ची पहिली सेल आज, बघा लेटेस्ट फोनची किंमत आणि ऑफर्स

ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत सर्वांनी अयानच्या दिग्दर्शन आणि VFXचे कौतुक केले आहे. दरम्यान, रणबीरला 4 वर्षांनंतर पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या ट्रेलरमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज देखील ऐकायला मिळतोय. ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरला यु ट्यूबवर केवळ दोन तासांत तब्बल 11 लाखांच्या वर व्ह्यूज मिळाले. तर आलियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ट्रेलरला तब्बल 16 लाखांच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत. कारण चित्रपटाचा ट्रेलर अतिशय भव्यदिव्य आणि मनोरंजक आहे. 

हे सुद्धा वाचा : 'पृथ्वीराज' फ्लॉप झाला तरीही, शाहरुख-सलमानला मागे टाकून अक्षय बनला सर्वात लोकप्रिय अभिनेता

या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटासाठी त्यांचं आयुष्य पणाला लावत खूप कष्ट घेतले आहेत, असं कलाकार सांगतात. ही एक ट्रायलॉजी असून हा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 300 कोटींच्या घरात बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी रणबीर कपूरने जवळपास 25-30 कोटी रुपये घेतले, अशी माहिती मिळाली आहे. आलियाने तब्ब्ल 10-12 कोटी रुपये घेतल्याचे सांगितले जात आहे. तर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटासाठी जवळपास 8-10 कोटी रुपये घेतले आहेत.

चित्रपटामध्ये शाहरुख खान कुठे आहे?

एकीकडे ट्रेलरचे कौतुक होत असताना दुसरीकडे शाहरुख खान कुठे आहे? असा प्रश्न युजर्स विचारत आहेत. खरं तर, चित्रपटात अभिनेता शाहरुख खानचा कॅमिओ आहे, अशी चर्चा आहे. तर तो ट्रेलरमध्ये सुद्धा दिसेल, असे चाहत्यांना वाटले पण तसे झाले नाही. यामुळे चाहते ट्विट करत शाहरुख खान कुठे आहे, असा प्रश्न विचारत आहेत.

चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, 'ब्रह्मास्त्र' यावर्षी 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा मोठा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo