Brahmastra Cast fees: आलिया भट्ट ते रणबीर कपूर, जाणून घ्या ‘ब्रह्मास्त्र’ स्टार कास्टची फी

Updated on 31-Aug-2022
HIGHLIGHTS

'ब्रह्मास्त्र' स्टार कास्टला मिळाले जबरदस्त मानधन

सोशल मीडियावर या चित्रपटावरही बहिष्कार टाकला जात आहे.

#BoycottBrahmastra सुमारे 60,000 ट्विटसह ट्रेंड करत आहे.

एकीकडे प्रेक्षक 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर या चित्रपटावरही बहिष्कार टाकला जात आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय स्टारर ब्रह्मास्त्रची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या चित्रपटासाठी स्टारकास्टला किती मानधन मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा : SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर! 'हे' महत्त्वाचे काम आता WhatsAppवर होणार, जाणून घ्या सविस्तर

स्टार कास्टची फी किती आहे?

ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी सिनेप्रेमी आणि व्यापार विश्लेषक खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी असून त्यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर हा चित्रपट बनवला आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट असून त्याला चांगली फीही मिळाली आहे. 

चित्रपटात आलिया भट्ट : 10-12 कोटी रुपये, रणबीर कपूर:  25-30 कोटी रुपये, अमिताभ बच्चन: 8-10 कोटी रुपये, मौनी रॉय : 3 कोटी रुपये, नागार्जुन: 9-11 कोटी रुपये आणि डिंपल कपाडिया : 1-2 कोटी रुपये कलाकारांना इतके मानधन मिळाल्याचे समोर आले आहे.

बॉयकॉट होतेय ब्रह्मास्त्र…

यापूर्वी ट्विटरवर अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात आला होता आणि आता या यादीत ब्रह्मास्त्रचे नावही सामील झाले आहे. बुधवारी सकाळपासून, #BoycottBrahmastra सुमारे 60,000 ट्विटसह ट्रेंड करत आहे. बॉयकॉट ब्रह्मास्त्रच्या पोस्ट बघितल्या तर कोणी आलिया भट्टच्या 'तुम्हाला मी आवडत नसेल तर पाहू नका' या विधानामुळे चित्रपटावर बहिष्कार टाकत आहे, तर कोणी पीके चित्रपटात रणबीर कपूरच्या कॅमिओचे कारण सांगत आहे.  याशिवाय रणबीरचे 'बीफ चॉइस' हे वक्तव्यही चर्चेत आहे. त्याचबरोबर काही लोकांनी अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांच्या कुटुंबावरही निशाणा साधला आहे. दरम्यान चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :