'ब्रह्मास्त्र' चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील
रविवारी चित्रपटाचा एकूण व्यवसाय 209-210 कोटी रुपयांच्या आसपास
लवकरच चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र एकामागून एक नवीन रेकॉर्ड बनवत आहे. बहिष्कार आणि रद्द करण्याचा ट्रेंड मोडून, चित्रपटाने हे सिद्ध केले आहे की, निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक चांगला मोठा स्क्रीन एक्सपेरियन्स दिला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले असून त्याचे एकूण कलेक्शन तब्बल 200 कोटींच्या पुढे गेले आहे.
लॉकडाऊन झाल्यापासूनच, बॉलीवूडला अशा चित्रपटाची गरज होती जी प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये खेचून आणतील. आतापर्यंत या चित्रपटाने बेहिशेबी विक्रम मोडले आहेत आणि चित्रपटगृहांमध्ये टिकून आहे.
ब्रह्मास्त्र 200 कोटीच्या क्लबमध्ये सामील
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रच्या व्यवसायाने दहाव्या दिवशी पुन्हा एकदा जोरदार झेप घेतली. रविवारी चित्रपटाच्या व्यवसायात एकूण 15 टक्क्यांनी वाढ झाली. एका रिपोर्टनुसार, रविवारी चित्रपटाने 16 कोटी 25 लाख ते 17 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाचा एकूण व्यवसाय 209-210 कोटी रुपयांच्या आसपास गेला आहे.
चित्रपटाची वाटचाल 250 कोटींकडे
या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात जवळपास 40 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी लोक सतत थिएटर्सकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत लवकरच हा चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा विश्वास दर्शविला जात आहे. अनेक कारणांमुळे हा चित्रपट ट्रोलही होत आहे पण हिंदी चित्रपटांमध्ये इतका जबरदस्त VFX कधीच पाहिला गेला नसेल यात मात्र शंका नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.