boAt ने भारतात आपले नवीन स्मार्टवॉच boAt Wave Neo लाँच केले आहे. बोट वेव्ह निओ हार्ट रेट आणि SpO2 सेन्सर सारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या स्मार्टवॉचची किंमत एकूण 1,799 रुपये आहे. या डिव्हाईसची विक्री 27 मे रोजी म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता सुरू होईल. कंपनीने हे वॉच ब्लू, ब्लॅक आणि बरगंडी कलर वेरिएंटमध्ये बाजरात आणले आहे. ही वॉच तुम्ही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात, या नवीन स्मार्टवॉचमध्ये कंपनीने कोणते खास फीचर्स दिले आहेत…
नवीन स्मार्टवॉचमध्ये, कंपनीकडून 454×454 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.69-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 550 निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो. तुम्हाला या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स मिळतील. यामध्ये, कंपनीने हार्ट रेट सेन्सरसह रक्तातील ऑक्सिजन लेवल माहिती करण्यासाठी SpO2 मॉनिटर देखील दिला आहे. याव्यतिरिक्त, यात तुम्हाला स्लीप मॉनिटर आणि स्ट्रेस ट्रॅकर देखील मिळेल.
ही वॉच अनेक स्पोर्ट्स मोडला देखील सपोर्ट करते. वॉचमध्ये मिळणाऱ्या स्पोर्ट्स मोडमध्ये वॉकिंग, रनिंग, क्लाइम्बिंग, योग, बास्केटबॉल, सायकलिंग, बॅडमिंटन आणि स्विमिंग यांचा समावेश आहे. या वॉचची खरी विशेषता म्हणजे ही डेली ऍक्टिव्हिटी जसे की, स्टेप काउंट, डिस्टंस ट्रॅव्हल्ड, कॅलरी बर्न यांची देखील माहिती देते.
वॉचमध्ये तुम्हाला कॉल अलर्ट, अलार्म, म्युझिक आणि कॅमेरा कंट्रोल देखील मिळेल. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येत असलेल्या या वॉचमध्ये SMS आणि वेदर अपडेट सपोर्ट देखील मिळेल. IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टंट असेलेली ही वॉच पावरफुल बॅटरीसह लोडेड आहे. ही वॉच सिंगल चार्जवर 7 दिवसांपर्यंत चालेल, असा दावा कंपनीने केला आहे.