Butter From Air: ऐकावं ते नवलंच! Bill Gates च्या कंपनीने चक्क हवेपासून बनवले बटर, चव आणि लाभ खऱ्यापेक्षा अप्रतिम 

Butter From Air: ऐकावं ते नवलंच! Bill Gates च्या कंपनीने चक्क हवेपासून बनवले बटर, चव आणि लाभ खऱ्यापेक्षा अप्रतिम 
HIGHLIGHTS

कॅलिफोर्निया-आधारित स्टार्टअप Savor ने डेअरी-मुक्त बटर तयार केले.

या 'Butter From Air' ची चव खऱ्या बटरसारखीच आहे.

Savor ने आइस्क्रीम, चीज आणि दुधाचे दुग्धविरहित पर्यायही विकसित केले आहेत.

Butter From Air: आज आम्ही तुम्हाला एक आश्चर्यकारक बातमी सांगणार आहोत. कॅलिफोर्निया-आधारित स्टार्टअप Savor ने डेअरी-मुक्त बटर तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली आहे. या ‘Butter From Air’ ची चव खऱ्या बटरसारखीच आहे. एवढेच नाही तर, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक Bill Gates द्वारे समर्थित Savor ने आइस्क्रीम, चीज आणि दुधाचे दुग्धविरहित पर्यायही विकसित केले आहेत.

Also Read: Realme Watch S2 ची लाँच डेट कन्फर्म! AI व्हॉईस असिस्टंटसह लेटेस्ट स्मार्टवॉच लवकरच भारतात होणार दाखल

हवेपासून कसे बनत आहे लोणी?

तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडत असेल की, दुग्धविरहित लोणी कसे तयार होऊ शकते. तर, Savor विशेष थर्मोकेमिकल प्रक्रिया वापरून कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र करून चरबी रेणू तयार करू शकते. या इनोवेशनद्वारेच ते लोणी म्हणजेच बटर बनवू शकतात. या बटरची चव खऱ्या लोण्यासारखीच आहे. त्याबरोबरच, यावर पर्यावरणाचाही परिणाम कमी होतो.

savor's butter from air

“या दुग्धविरहित बटरमध्ये 0.8 ग्रॅम प्रति किलोग्रॅमपेक्षा कमी कार्बन फूटप्रिंट आहे. त्या तुलनेत नियमित बटरमध्ये 80% फॅट आणि प्रति किलोग्राम बटरमध्ये 16.9 ग्रॅम कार्बन फूटप्रिंट असतो”, असा Savor ने दावा केला आहे.

काय म्हणाले Savor चे CEO?

Savor चे CEO कॅथलीन अलेक्झांडर म्हणाले की, “आम्ही सध्या पूर्व-व्यावसायिक टप्प्यात आहोत आणि आमचे बटर विकण्यासाठी नियामक संमती मिळविण्यावर काम करत आहोत. दुग्धविरहित बटरची विक्री किमान 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा नाही. आत्तापर्यंत आम्ही अनौपचारिकपणे डझनभर लोकांसह चवीची चाचणी केली आहे. त्यानंतर औपचारिक चव चाचणी घेण्याची योजना करत आहोत, कारण आम्ही आता व्यावसायिकीकरणाच्या जवळ जात आहोत.”

काय म्हणाले Bill Gates?

Milk-free-butter

Bill Gates यांनी एका ऑनलाइन ब्लॉग पोस्टमध्ये या नव्या प्रकल्पासाठी आपला पाठिंबा व्यक्त करताना म्हटले की, “प्रयोगशाळेत बनवलेल्या फॅट्स आणि तेलांवर स्विच करणे सुरुवातीला थोडे विचित्र वाटू शकते, परंतु आपल्या कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची त्यांची क्षमता खूप मोठी आहे. सिद्ध तंत्रज्ञानाचा वापर करून, आम्ही आमची हवामान उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गावर आहोत.”

पुढे Bill Gates म्हणाले की, “या प्रक्रियेत कोणतेही हरितगृह वायू सोडले जात नाहीत, शेती वापरली जात नाही आणि पारंपारिक शेतीच्या हजारव्या भागापेक्षाही कमी पाण्याचा वापर होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याची चव उत्तम आहे, अगदी खऱ्या बटरप्रमाणेच, कारण याची प्रक्रिया ती रासायनिकदृष्ट्या जवळपास एकसारखी आहे.”

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo