सलमानने शूट केला BIGG BOSS 16 चा पहिला प्रोमो व्हिडिओ, ‘हे’ दोन सेलिब्रिटी होणार शोचा भाग
BIGG BOSS 16 चा पहिला प्रोमो व्हिडिओ सलमानने शूट केला
बिग बॉसचा सीझन 16 पुढील महिन्यात सुरू होणार
स्पर्धक म्हणून अजून दोन सेलिब्रिटींची नावे समोर
TV चा सर्वात मोठा रियालिटी शो 'बिग बॉस'चा एक सीझन संपताच प्रेक्षकांमध्ये पुढच्या सीझनची चर्चा सुरू होते. बिग बॉसचा सीझन 16 पुढील महिन्यात सुरू होत आहे. दरम्यान सलमान खानने नुकताच शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ शूट केला आहे. शोच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, सलमान खानने 5 सप्टेंबर रोजी फिल्मसिटीमध्ये बिग बॉसचा पहिला प्रोमो व्हिडिओ शूट केला.
हे सुद्धा वाचा : iPhone 14 सिरीजमध्ये झालेले बदल; 48MP कॅमेर्यापासून ते Dynamic Island नॉचपर्यंत सर्वकाही जाणून घ्या…
बिग बॉस 16 साठी 'या' स्पर्धकांची नावे समोर
शोमध्ये सहभागी होणार्या स्पर्धकांची अनेक नावे समोर येत आहेत परंतु अद्याप कोणावरही अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. अलीकडेच आमिर खानचा भाऊ फैजल खान याने सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले होते की, त्याला बिग बॉसच्या ताज्या सीझनसाठी ऑफर मिळाली आहे.
काय म्हणाला फैजल खान…
त्याची तब्येत आता बरी असल्याचे सांगताना फैजलने सांगितले की, त्याला दोन मोठे शो ऑफर करण्यात आले होते. एक बिग बॉस 16 आणि दुसरा टीव्ही शो. तो म्हणाला, 'बिग बॉसकडून ऑफर आली होती पण मी ती नाकारली, दुसरी ऑफर एका टीव्ही सीरियलची होती . मी खूप उत्साहित आहे की लोक माझ्याबद्दल विचार करत आहेत. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा की मला काही काम मिळू शकेल.'
फैजल म्हणाला की, लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी जेणेकरून तो लोकांचे मनोरंजन करू शकेल आणि कोणत्याही वेब सीरिज किंवा चित्रपटाचा भाग होऊ शकेल. पश्चिम बंगालची वादग्रस्त अभिनेत्री आणि राजकारणी नुसरत जहाँ या शोचा एक भाग असणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, तिने या शोचा भाग होण्याबाबत सध्या संपूर्ण मौन बाळगले आहे.
दरम्यान, आता भोजपुरी अभिनेत्री निशा पांडेचेही नाव स्पर्धक म्हणून समोर येत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर निशा पांडे बिग बॉस सीझन 16 चा भाग असू शकते. एका रिपोर्टनुसार, शोच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, 'निशा भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील एक अतिशय प्रतिभावान गायिका आहे आणि ती शोमध्ये मनोरंजनाचा घटक जोडण्यासाठी काम करेल.' रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की निशा शोसाठी जवळपास फायनल झाली आहे. मात्र, नावांची अधिकृत यादी अजून येणे बाकी आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile