वादग्रस्त स्पर्धकांमुळे BIGG BOSSचा जवळपास प्रत्येक सीझन चांगलाच गाजला आहे. त्यामुळे शो ची OTT आवृत्तीही आणण्यात आली, ज्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी, हा शो Voot वर लाँच करण्यात आला होता आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने होस्ट केला होता. होस्ट म्हणून करण जोहरने आपल्या बाजूने 100 % देण्याचा प्रयत्न केला. आता या शोच्या नव्या सीझनची चर्चा सुरु झाली आहे. अलीकडेच अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यावेळी करण जोहर नाही तर हिना खान शो होस्ट करणार आहे. हिना खानच्या चाहत्यांसाठी ही बातमी स्वप्नापेक्षा कमी नव्हती. पण आता यामध्ये एक वेगळेच ट्विस्ट आले आहे.
हे सुद्धा वाचा : OnePlus Nord 2T वर पहिल्या सेलमध्ये मिळतेय प्रचंड सवलत मिळत आहे, जाणून घ्या ऑफर
बिग बॉस OTT चा पुढचा सीझन हिट करण्यासाठी निर्मात्यांनी तयारी केली आहे. यावेळी त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, यावेळी या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग करण जोहरची जागा घेणार आहे. तारखांच्या कमतरतेमुळे करण जोहर हा शो होस्ट करू शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले की रणवीर हा शो होस्ट करणार नाही. याआधी रणवीर सिंगने टीव्हीवर 'द बिग पिक्चर' नावाचा आणखी एक रियालिटी शो होस्ट केला आहे आणि सध्या तो त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
बिग बॉस OTTच्या दुसऱ्या सीझनसाठीही निर्मात्यांनी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, यावेळी कांची सिंह, पूजा गौर आणि महेश शेट्टी या शोचा भाग असू शकतात. याशिवाय निर्मात्यांनी या शोसाठी संभावना सेठ आणि पूनम पांडे यांनाही संपर्क साधला आहे. मात्र, या दोन्ही सौंदर्यवतींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, बिग बॉस OTT नवा सिझन कोण होस्ट करणार? तसेच शोमध्ये कोणकोणते सेलेब्स सहभागी होतील, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता बघायला मिळतेय.