'Bigg Boss 16' चा टीझर रिलीज झाला आहे. शोचा पहिला प्रोमो रविवारी आला. आता पडद्यामागे प्रोमोचे शूटिंग टीझर व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. क्रू मेंबर्स सेटची तयारी करत आहेत. त्यावेळी शो चा होस्ट आणि सलमान खानची सेटवर एंट्री होतेय. व्हिडिओसह, सलमान खानने शोच्या स्वरूपाविषयी एक इशारा दिला आहे. टीव्हीच्या या सर्वात वादग्रस्त रियालिटी शोसाठी तो म्हणतो की, यावेळी कोणताही नियम नसेल.
'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांना बिग बॉसने बनवलेले नियम पाळावे लागतात. असे असूनही अनेक वेळा स्पर्धक ते नियम तोडताना दिसतात. अशा स्थितीत शोमध्ये नियम नसतील, तर यावेळी जोरदार हंगामा बघायला मिळणार आहे.
सलमानने टीझरमध्ये सांगितला नियम
'बिग बॉस 16' चा प्रोमो एका उध्वस्त ठिकाणी शूट करण्यात आला आहे. जिथे जुन्या झुंबरापासून खुर्ची आणि टेबलपर्यंत सर्व वस्तू अस्ताव्यस्त दिसत आहेत. क्रू मेंबर्स सेटवर तयारी करत आहेत. नवीन टीझरमध्ये सलमान म्हणतो, "रूल ये है कि कोई रूल नहीं है। हमेशा फर्स्ट टाइम होता है और हमेशा नेक्स्ट टाइम होता है। इस बार बिग बॉस टाइम है।''
लवकरच टीव्हीवर येणार शो
कलर्स टीव्हीच्या अधिकृत पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "कोणत्याही नियमाशिवाय, यावेळी बिग बॉस टाइम आहे. बिग बॉस 16 लवकरच पहा, फक्त कलर्सवर."
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.