New Sim Card Rule: TRAI ने उचलले मोठे पाऊल! सिम पोर्ट करण्याचे नियम बदलले, वाचा डिटेल्स 

New Sim Card Rule: TRAI ने उचलले मोठे पाऊल! सिम पोर्ट करण्याचे नियम बदलले, वाचा डिटेल्स 
HIGHLIGHTS

1 जुलै 2024 पासून TRAI ने सिम कार्डशी संबंधित नियम बदलले.

आता मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी वेळ लागेल.

नव्या नियमासह सरकार वापरकर्त्यांना होणारी गैरसोय कमी करू इच्छित आहे.

New Sim Card Rule: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने अलीकडेच सिम कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत. हे नियम सोमवारी 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सिम स्वॅप आणि ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे म्हटले जात आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांपासून सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणे हा सरकारचा मुख्य उद्देश होय.

Also Read: Important Tips: ‘या’ फीचरद्वारे तुमचे Aadhar कार्ड सुरक्षित करा, कुणालाही चुकीचा वापर करता येणार नाही। Tech News

Sim Card नवे नियम

आता मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी वेळ लागेल. देशात होणाऱ्या फसवणुकी कमी करण्यासाठी TRAI ने मार्चमध्ये मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. दरम्यान या अपडेटनंतर, सिम चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास, तुम्हाला नवीन सिमसाठी 10 ऐवजी 7 दिवस प्रतीक्षा करावी लागेल, त्यानंतरच सिम पोर्ट करता येईल.

TRAI ने अलीकडेच Sim Card शी संबंधित नियम बदलले
Sim Card नवे नियम

या नव्या नियमासह सरकार वापरकर्त्यांना होणारी गैरसोय कमी करू इच्छित आहे. परंतु त्याच वेळी सरकारला सिमचे फ्रॉड पोर्टिंग थांबवायचे आहे. कारण फ्रॉड पोर्टींग आजकाल अगदी सामान्य झाले आहे.

  • नंबर दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करण्यासाठी, वापरकर्त्यांना प्रथम अर्ज करणे आवश्यक आहे.
  • यासाठी वापरकर्त्यांना Aadhaar Card, Address Certificate आणि ओळखपत्र यांसारखी महत्त्वाची माहिती पुरावा म्हणून द्यावी लागेल.
  • याशिवाय बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनही करावी लागेल.
  • त्यानंतर, वापरकर्त्यांना एक OTP मिळेल, जो पोर्टेबिलिटी दरम्यान वापरला जाईल. यानंतर नंबर पोर्ट केला जाईल.

TRAI च्या दुसऱ्या नव्या नियमाबद्दल बोलायचे झाल्यास, आता सरकारने एक अतिरिक्त निकष सादर केला आहे, ज्या अंतर्गत ते युनिक पोर्टिंग कोड (UPC) साठी केलेली रिक्वेस्ट नाकारू शकतात. जर तुम्ही तुमचे सिम कार्ड Swap किंवा रिप्लेस करण्याचा विचार करत असाल तर UPC खूप महत्वाचे आहे. आता कोणत्याही वापरकर्त्याने 7 दिवसांच्या आत सिम Swap किंवा रिप्लेस करण्याची रिक्वेस्ट सबमिट केल्यास त्याला UPC दिली जाणार नाही.

सिम बदलण्याशी संबंधित फसवणुकींना मोठ्या प्रमाणात टाळण्यासाठी हा सरकारचा आणखी एक सुरक्षा प्रयत्न आहे. मात्र, प्रतीक्षा वेळ 10 दिवसांवरून 7 दिवसांवर आणून अनेक वापरकर्त्यांना दिलासा नक्कीच मिळाला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo