कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ ठरला ब्लॉकबस्टर, आतापर्यंत झाले कोट्यवधींचे कलेक्शन

Updated on 16-Jun-2022
HIGHLIGHTS

'भूल भुलैया 2' ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

भूल भुलैया 2 ने पार केला 175 कोटींचा टप्पा

चित्रपटाची कमाई अजूनही सुरुच.

'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या यशाने अभिनेता कार्तिक आर्यन भारावून गेला आहे. कार्तिकच्या या चित्रपटासमोर मोठे कलाकारांचे चित्रपटसुद्धा अपयशी ठरताना दिसले. चौथ्या आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. 'भूल भुलैया 2' च्या यशाने कार्तिकच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही भर पडली आहे. यानंतर आता त्याच्या इतर चित्रपटांचीही प्रेक्षक  आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या तरी 'भूल भुलैया 2'चा वेग कायम आहे. यासोबतच तो ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीतही सामील झाला आहे. कार्तिक आर्यनने ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : 8,800 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Samsung फोन खरेदी करा, 48MP कॅमेरासह मिळेल 6000mAh बॅटरी

कोट्यवधींची झाली कमाई

 अनीस बज्मी दिग्दर्शित भूल भुलैया 2 ने 175 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणार्‍या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'भूल भुलैया 2' ने 175 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाला आता ब्लॉकबस्टरचे प्रमाणपत्र मिळाले आहे. चौथ्या आठवड्यातील शुक्रवारी चित्रपटाने 1.56 कोटी, शनिवारी 3.01 कोटी, रविवारी 3.45 कोटी, सोमवारी 1.30 कोटी, मंगळवारी 1.29 कोटी आणि बुधवारी 1.26 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने एकूण 175.02 कोटींची कमाई केली आहे
 
तरण आदर्शचे ट्विट रीपोस्ट करत कार्तिक आर्यनने लिहिले – 'आता सर्टिफाईड ब्लॉकबस्टर.' पुढे त्याने नमस्कार केलेला एक इमोजी देखील बनवला आहे.

https://twitter.com/TheAaryanKartik/status/1529406136054448129?ref_src=twsrc%5Etfw

 'भूल भुलैया 2' हा कार्तिक आर्यनच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे. कार्तिकशिवाय या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :