गेमिंग लव्हर्स ! BGMI ची भारतात जबरदस्त री-एंट्री, दिवसातून फक्त ‘इतके’ तास खेळता येईल गेम ?

गेमिंग लव्हर्स ! BGMI ची भारतात जबरदस्त री-एंट्री, दिवसातून फक्त ‘इतके’ तास खेळता येईल गेम ?
HIGHLIGHTS

अखेर बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया BGMI ने आता भारतात पुनरागमन केले आहे.

आता तुम्हाला Google Play Store वरून kraftan चे हे गेमिंग ऍप डाउनलोड करता येईल.

18 वर्षाखालील वापरकर्ते दररोज फक्त 3 तास BGMI खेळू शकतात.

जुलै 2022 मध्ये, सुरक्षेच्या कारणास्तव बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया BGMI वर भारतात बंदी घालण्यात आली होती. BGMI आधीच सर्वाधिक डाउनलोड आणि वापरकर्त्यांसह लोकप्रिय ऍप आहे. बऱ्याच दिवसांपासून BGMI भारतात परत येणार, असा बातम्या सुरु होत्या. आता अखेर बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया BGMI ने आता भारतात पुनरागमन केले आहे. आता तुम्हाला Google Play Store वरून kraftan चे हे गेमिंग ऍप डाउनलोड करता येईल. 

Battlegrounds Mobile India (BGMI)

जोपर्यंत भारतात गेमवर बंदी घालण्यात आली होती, तोवर Battlegrounds Mobile India (BGMI) ने भारतात 100M पेक्षा जास्त डाऊनलोड्स मिळवले होते.  शिवाय, हे गेम बॅन झाले तेव्हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारे Android ऍप म्हणून या गेमने इतिहासही रचला होता. मात्र, देशातील जनतेच्या डेटा सुरक्षेमुळे सरकारने या ऍपवर भारतात पूर्णपणे बंदी घातली. 

 

 

 अहवालात असेही म्हटले आहे, की ज्या लोकांनी त्यांच्या फोनवर ऍप डाउनलोड केले. त्यापैकी 59% लोक गेम खेळण्याची शक्यता जास्त आहे. आता सरकारने या गेमिंग ऍपवरील बंदी उठवली आहे, बॅटल ग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) अधिकृतपणे उपलब्ध आहे. तुम्ही Google Play Store वरून Battle Grounds Mobile India (BGMI) डाउनलोड करू शकता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा गेम 90 दिवसांच्या ट्रायल पिरेडसह लाँच केला गेला आहे. आजपासून प्लेयर्स गेमिंग सुरु करू शकतील. या ट्रायल पिरेडवरून गेमचे भविष्य ठरणार आहे, असे म्हणता येईल. कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन गेम अपडेट नव्या मॅपसह आला आहे. यासह बरेच इन गेम्स इव्हेंट्स देखील जोडले गेले आहेत. कंपनीने गेमला 'इंडिया की हार्टबीट' मार्केटींग कॅम्पेनसह आणले आहे. 

किती तास खेळता येईल गेम ? 

अशी देखील माहिती मिळाली आहे की, 18 वर्षाखालील वापरकर्ते दररोज फक्त 3 तास BGMI खेळू शकतात. दुसरीकडे, 18 वर्षांवरील वापरकर्ते दिवसातून केवळ 6 तास हा गेम खेळू शकणार आहेत.  

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo