Battlegrounds Mobile India BGMI वर गेल्या वर्षी जुलैमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या तरतुदींनुसार बंदी घालण्यात आली होती. परंतु आता ते भारतात परत येण्यासाठी सज्ज झाले आहे. दक्षिण कोरियन गेम कंपनी Krafton ने जाहीर केले आहे की, त्यांना भारतात हा गेम पुन्हा लाँच करण्याची परवानगी मिळाली आहे.
गेल्या 19 मे रोजी गेमच्या पुनरागमनाच्या अधिकृत घोषणेसह, क्राफ्टनने सर्व्हर देखील डाउन केले होते. बॅटल रॉयल टायटलचे 23 मे पर्यंत सर्व्हर ऍक्सेस नव्हते आणि प्लेयर्स पुन्हा BGMI कधी खेळू शकतील याबद्दल क्राफ्टनकडून कोणताही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Krafton च्या वेबसाइटवरील अधिकृत ब्लॉग पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, '' गेमच्या सेवा या महिन्यात सुरू होणार आहेत. म्हणजेच आता चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही आणि ते लवकरच त्यांचा आवडता खेळ परत येईल, अशी अपेक्षा करू शकतात. "
BGMI सर्व्हर काही काळासाठी ऑफलाइन आहेत आणि जेव्हा जेव्हा प्लेयर्स त्यांच्या डिव्हाइसवर गेम लाँच करतात तेव्हा त्यांना डेव्हलपरकडून 'सर्व्हर उपलब्ध नाहीत' असा संदेश मिळतो. जर प्लेयर्सने मॅसेज क्लोज करून अकाउंट पुन्हा साइन-इन करण्याचा प्रयत्न केला, तर एक एरर येतो. ज्यामध्ये ''सर्व्हर अद्याप ऑनलाईन नाही आणि अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा.''असे दिसेल.
सर्व्हर ऑनलाईन कधी येणार याबाबत अद्याप काही माहिती नाही. त्यामुळे प्लेयर्सने अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी. नव्या गेममध्ये अनेक नवीन सुधारित आणि इंटरेस्टिंग बदल पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. गेम उपलब्ध झाल्यास तुम्ही हा गेम Play Store आणि Apple Store वरून डाउनलोड करू शकतील.