आजकाल जिकडे तिकडे AI चे क्रेझ आणि उपयोग दोन्ही वाढत चालले आहेत. त्याबरोबरच, आता उन्हाळ्याला देखील सुरुवात झाली आहे. AI ने माणसाच्या गरज अगदी सोप्या रीतीने पूर्ण केल्याचे आपण दररोज ऐकत असतो. याबरोबरच, AI आता घरगुती उपकरणांमध्येही लोकप्रिय होत जात आहे. या रिपोर्टमध्ये आज आम्ही सर्वोत्कृष्ट AI एअर कंडिशनर्स AC बद्दल बोलणार आहोत, जे कृत्रिम बुद्धिमत्तेची शक्ती वापरून तुमच्या घरातील वातावरण व्यवस्थित ठेवण्यास मदत करतील.
हे सुद्धा वाचा: अरे बापरे! OnePlus फोन्सची मोबाईल शॉप आणि रिटेल स्टोअर्सवर विक्री होणार बंद? 1 मे पासून होईल परिणाम। Tech News
सभोवतालचे तापमान आणि हवामानाची स्थिती रात्री बदलत असते. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता एअर कंडिशनर्सना त्यांचे कूलिंग आपोआप समायोजित करण्यासाठी पुरेसे स्मार्ट बनवते. जेणेकरून तुम्हाला तुमचा AC चालू/बंद करण्यासाठी मध्यरात्री जागे होण्याची गरज नाही. त्याबरोबरच, आपल्याला त्याचे तापमान पुन्हा पुन्हा सेट करण्याची देखील आवश्यकता राहत नाही.
आम्ही तुमच्यासाठी या रिपोर्टमध्ये काही निवडक AI AC ची यादी तयार केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात यादी-
हा ड्युअल इन्व्हर्टर कंप्रेसरसह 1.5 टन स्प्लिट AC आहे. 6-इन-1 AI कॉम्प्रेसर हवामान, खोलीचे तापमान आणि इतर गोष्टींवर आधारित कूलिंग क्षमता समायोजित करण्यासाठी AI वापरतो. यामुळे शांत झोपेसाठी तापमान राखले जाईल, याची खात्री होते. येथून खरेदी करा
Samsung हा एक ब्रँड आहे, जो AI ला त्याच्या उत्पादनांमध्ये सादर करण्याची जोरात तयारी दर्शवत आहे. AI Pro आणि AI Pro Plus तंत्रज्ञानासह AC ची विंडफ्री रेंज AI कूलिंगचा फायदा घेते. यामुळे सभोवतालच्या परिस्थितीवर आणि वापराच्या पद्धतींवर आधारित खोलीचे तापमान आपोआप व्यवस्थापित होते. या AC मध्ये SmartThings इंटिग्रेशन देखील आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे ते सहजपणे नियंत्रित आणि ऑपरेट करू शकता.
हा Panasonic चा एक स्मार्ट AC आहे, जो तुम्ही Google Assistant आणि Alexa सारख्या लोकप्रिय स्मार्ट AI सहाय्यकांचा वापर करून ऑपरेट करू शकता. या AC चा ट्रू AI मोड खोलीचे तापमान हुशारीने ओळखण्यासाठी आणि कूलिंगच्या गरजांचा अंदाज घेण्यासाठी अंगभूत सेन्सर्स आणि AI चा वापर करतो, त्यानुसार पंख्याचा वेग समायोजित होतो. येथून खरेदी करा
नावावरून समजलेच असेल की, हे स्प्लिट AC व्हेरिएबल स्पीड कंप्रेसरसह AI फ्लेक्सिकूल इन्व्हर्टर तंत्रज्ञान वापरते, जे उष्णतेच्या भारानुसार पॉवर आणि कूलिंग क्षमता समायोजित करते. व्हेरिएबल 6-इन-1 इन्व्हर्टर तंत्रज्ञान वापरकर्त्यांना कूलिंग क्षमता समायोजित करण्यास अनुमती देते. एवढेच नाही तर, उपकरण 50% पर्यंत ऊर्जा वापर वाचवते. येथून खरेदी करा